भारताचा डाव सुरू असताना ९व्या षटकांत युवा सलामी फलंदाज यशस्वी जायसवालसोबत ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जायसवालची बॅटच तुटली
सामन्याच्या सुरूवातीलाच यशस्वी जायसवालच्या बॅटचा हँडल तुटला. भारताचा डाव सुरू असताना ९व्या षटकांत वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. यावेळेस यशस्वी जायसवाल स्ट्राईकवर होता. या षटकातील पाचव्या बॉलवर जायसवालने एक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक उसळला आणि सरळ त्याच्या बॅटच्या हँडलला लागला. बॉल इतका जोरात होता की जायसवालच्या बॅटचे हँडलच तुटले. हे पाहून मैदानावरील खेळाडू, अंपायर आणि चाहतेही हैराण झाले. जायसवालने लगेचच तुटलेली बॅट पाहिली आणि बदलण्यासाठी डगआऊटच्या दिशेने इशारा केला.