मोहित सोमण: सोन्याच्या तुफानीत आज आणखी एकदा 'सुसाट' वाढ झाली. त्यामुळे सलग सहाव्यांदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. जागतिक सोन्याच्या निर्देशांकात न थांबणारी वाढ होत असल्याने भारतीय बाजारपेठेत सोन्यात वाढ सुरूच आहे. त्यात सातत्याने घसरणारा रूपया सोन्याच्या किंमतीला सपोर्ट लेवल राखण्यास अपयशी ठरला आहे. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०४ रूपयांनी झाली आ हे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९५ रूपयांनी व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरातही ७८ रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०२३३ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३८० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६७५ रूपयांवर गेली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०४० रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी १०२३३० रूपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ९५० रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी ९३८०० रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ७८० रूपयाने वाढ झाल्याने दरपातळी ७६७५० रूपयांवर गेली आहे.
जागतिक सोन्याच्या निर्देशांकात (Gold Futures Index) यामध्ये आश्चर्यकारकरित्या ०.२४% घसरण झाली. तर युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३५% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३४२३.२२ औंसवर सकाळपर्यंत गेली आहे. भारतातील कमोडिटी बाजाराती ल एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX Comex) निर्देशांकात सकाळपर्यंत ०.०८% घसरण झाल्यानंतर दरपातळी १००२४८.०० पातळीवर गेले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०२३३ रूपये,२२ कॅरेटसाठी ९३८० रूपये सुरू आहे.
जागतिक सोन्याच्या दरात का वाढ होत आहे?
जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात काल रात्रीपर्यंत मोठी. वाढ झाली आहे. ही वाढलेली पातळी सातत्याने आणखी वाढत असल्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेन बाजारातील गुंतवणूकदारांना वाढलेला आत्मविश्वास पाहता मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. प्रत्यक्ष सोन्यासह ईपीएफ गुंतवणूकीत वाढ झाली आहे. पुरवठ्याच्या तुलनेत आणखी मागणीत वाढ होत आहे. भारतीय सराफा बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असल्याने ही पातळी आणखी वाढ होत आहे. डोना ल्ड ट्रम्प यांनी जपान बरोबर टेरिफ डील जाहीर केल्याने वाढ झाली. दरम्यान, भारत आणि चीनसारख्या इतर प्रमुख अर्थव्यवस्थांसोबत अमेरिकेच्या टेरिफ वाटाघाटी सुरू आहेत.तर आशियाई बाजारातील सेटीमेंटमध्येही या कारणांमुळे वाढ झाली. आजही सका ळच्या सत्रात डॉलरमध्ये वाढ झाल्याने ही पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चालू व्यापारविषयक समस्या आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या नवीन संभाव्य भाकीत अथवा चिंतांमुळ गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत. लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत विशेषतः माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रो जी ठरवलेली आगामी व्यापार शुल्काची अंतिम मुदत ठरणार असल्याने बाजारात जोखीम विरोधी वातावरण आहे ज्याचा फटका सोन्यात बसला परिणामी सोन्याच्या किंमती पाच आठवड्याच्या उच्चांकावर (All time High) वर गेल्या आहेत.
चांदीच्या दरातही वाढच !
चांदीच्या दरातही आज दर उच्चांकावर गेला आहे. काल झालेल्या उच्चांक वाढीनंतर आजही पुन्हा चांदी वाढली आहे. ' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या किंमतीत आजही सलग दुसऱ्यांदा वाढ झाली. माहितीनुसार आज चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने वाढ झाल्याने दरपातळी ११९ रूपयांवर व प्रति किलो दर १००० रूपयांनी वाढत दरपातळी ११९००० रुपयांवर पोहोचली आहे.
जागतिक चांदीच्या निर्देशांकात (Silver Futures Index) यामध्ये सकाळपर्यंत पुन्हा ०.१३% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदी निर्देशांकात तब्बल ०.२५ वाढ झाल्याने चांदीची दरपातळी एमसीएक्सवर ११५९३९.०० पातळीव र गेली. चांदीचाही आज दोन आठवड्यातील दर उच्चांकी (All time High) पातळीवर आहे. सोन्याच्या जागतिक निर्देशांकाप्रमाणेच चांदीच्या दरातही गुंतवणूकीत व मागणीत वाढ झाल्याने होत आहे. ईव्ही वाहनातील, व औद्योगिक क्षेत्रातील मागणीत चांदीची वा ढती मागणी, अस्थिरतेचा सुरक्षित पर्याय म्हणून चांदीत वाढ होत आहे. आज खासकरून डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान बरोबर डील जाहीर केल्यानंतर वरच्या स्तरावरच बाजारात चांदी कामगिरी करत आहे.
भारतातील मुंबईसह मुख्य शहरातील चांदीचे प्रति ग्रॅम सरासरी दर प्रति ग्रॅम १२९० रूपयांवर व प्रति किलो दर १२९००० रूपयांवर आहे.