विधानपरिषद विरोधी पक्ष नेतेपदावरुन काँग्रेस -उबाठामध्ये रस्सीखेच

काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर


मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपणार असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे उबाठा सेनेने देखील विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे महाआघाडीमधील या दोन्ही घटक पक्षांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच सुरू आहे.


विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या सतेज पाटील हे विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत. दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात म्हणजे २९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानुसार त्यांना पावसाळी अधिवेशनात निरोप देण्यात आला. तरीही दानवे हे २९ ऑगस्टपर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर असणार आहेत. औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या अंबादास दानवे यांच्या निवृत्तीने उबाठा सेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने जास्त संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.



विधान परिषदेत काँग्रेसचे सात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन सदस्य आहेत. याशिवाय काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. या आधारे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.


दिल्लीतून पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात येते. विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता नाही. पंधराव्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.


उबाठाकडून विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. विधानसभेत भास्कर जाधव यांच्या नावाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल, असा काँग्रेसला विश्वास आहे. तथापि ठाकरे गट देखील विधान परिषद विरोधी पक्षनेता पदासाठी आग्रही आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी मुंबई: शिवसेनेचे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

दक्षिण मुंबईत १०० कोटींचा घोटाळा? महापालिकेच्या 'ए-वॉर्ड'वर दक्षता विभागाची धाड!

सुशोभीकरणाच्या कामात अनियमितता; गहाळ फायली, अनावश्यक बांधकाम, आणि 'दंडा'ची वसुली मुंबई: बृहन्मुंबई

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई : गोरेगावच्या नेस्को मैदानावर आज (गुरुवार २ ऑक्टोबर २०२५) शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ