शाळेत विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात ४० वर्षीय शिक्षिकेला जामीन


मुंबई : दादरमधील एका प्रतिष्ठीत शाळेतल्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात ४० वर्षीय शिक्षिकेला जामीन मिळाला आहे. मागील तीन आठवडे शिक्षिका अटकेत होती. अखेर पोक्सो न्यायालयाने शिक्षिकेला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीने पीडित मुलाला कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, भेटू नये किंवा धमकावू नये. तिला कोणत्याही साक्षीदाराला किंवा पीडित मुलाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क करण्यास, धमकी देण्यास किंवा आश्वासन देण्यास मनाई आहे, असे न्यायालयाने जामीन देताना सांगितले आहे.


आरोपीने खटल्यासाठी प्रत्येक न्यायालयीन तारखेला उपस्थित राहावे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये. यापैकी कोणत्याही किमान एका अटीचे उल्लंघन झाले तरी न्यायालय जामीन रद्द करेल, असे आरोपीला सांगण्यात आले आहे.


काय आहे प्रकरण ?


डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ओळख झाल्यानंतर जानेवारी २०२४ पासून शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याला अनेक वेळा दक्षिण मुंबई आणि विमानतळ परिसरातील मोठमोठ्या हॉटेलांमध्ये नेले. तिथे तिने त्याच्यासोबत मद्यपान करून आणि मानसिक ताण कमी होण्याची औषधे देऊन त्याचा लैंगिक छळ केला. हा आरोप विद्यार्थ्याने शिक्षिकेवर केला आहे. दहावी उत्तीर्ण होऊन शाळेबाहेर पडल्यानंतरही शिक्षिका पिच्छा सोडत नव्हती, अशीही तक्रार विद्यार्थ्याने केली आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीआधारे त्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीआधारे शिक्षिकेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला. यानंतर शिक्षिकेला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते.


Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५