कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून तरुणाचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा युवक मृत्यूमुखी पडला. ही घटना जानवली येथे मंगळवारी सकाळी ९.३० वा. सुमारास घडली.


राहुल सावर्डेकर हा कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करत होता. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाला दिलेल्या माहितीनुसार राहूल हा दरवाजाजवळ तोंड धूत होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने तो रेल्वेच्या बाहेर पडला व एका दगडावर आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मृत्युमुखी पडला.


दरम्यान, या घटनेची माहिती कोकणकन्या एक्सप्रेसच्या लोकोपायलेटने कणकवली रेल्वे स्टेशन येथे दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक दुर्गेश यादव घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. १०८ रुग्णवाहिकद्वारे दुर्गेश याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील

District Annual Plan funds : अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत! आता 'हा' निधी मदतीसाठी वापरणार; राज्य सरकारचे काय आहेत नवे आदेश?

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे

Maharashtra Rain News : IMD चा थेट इशारा! या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पाऊस; तुमचा भाग 'ऑरेंज' की 'यलो'?

मुंबई : महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे आणि हे क्षेत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये