Thursday, September 18, 2025

Kalyan Crime : धक्कादायक! कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून तरूणीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

Kalyan Crime : धक्कादायक! कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून तरूणीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

कल्याण : कल्याणमधल्या (Kalyan) नांदिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका परप्रांतीय तरूणाने रिसेप्शिस्ट म्हणून काम करणाऱ्या त्या तरूणीला आतमध्ये घुसून लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral video) होत असून गोपाल झा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा इतकंच ही तरुणी बोलली होती. त्यावरुन तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. कल्याण पूर्वमधील पिसवाली गाव येथील रहिवासी असलेल्या सोनाली प्रदीप कळासारे हिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे, आरोपीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनाली ही कल्याण पूर्वमधील श्री बाल चिकस्तालय (लिनिक) नांदिवली गाव येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्या कर्तव्यानुसार ती काम होती.

 

नेमकं काय घडलं ?

डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये म्हणजेच डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये (MR) बसले असताना कोणालाही आतमध्ये पाठवू नये, अशा सूचना आहेत. डॉक्टरांच्या याच नियमाचं पालन करत असताना एक नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये घुसला. त्यावेळी त्याला थांबा,आत जाऊ नका असं म्हटल्यामुळे त्याने मला सरळ पळत येऊन तोंडावर लाथ मारून खाली पाडलं. तसेच, माझे कपडे फाडून मला लाथा बुक्क्यानी मारहाण केल्याचं फिर्यादी तरुणीने म्हटलं आहे. घडलेला प्रकार हा काल म्हणजेच २१ जुलै २०२५ सायंकाळी ६:४५ वाजत घडला आहे. त्यानंतर, फिर्यादी तरुणीने काल मानपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर देखील तो नशेखोर तरुण अजूनही माझ्या राहत्या घराच्या अवती भोवती दिसून येत आहे, असे सोनाली कळासारे हिने म्हटलं आहे.

Comments
Add Comment