७/११ स्फोटांतील निर्दोष व्यक्तीच्या पुस्तकात पोलीस अधिकाऱ्याच्या 'गूढ' मृत्यूचा उल्लेख! नेमकं काय घडलं?

मुंबई: ११ जुलै २००६ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या तपास पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या रहस्यमय मृत्यूचा उल्लेख, याच प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या एका व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) विनोद भट यांचा २९ ऑगस्ट २००६ रोजी, म्हणजेच विनाशकारी रेल्वे बॉम्बस्फोटानंतर अवघ्या दोन महिन्यांनी, गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याचे वृत्त होते; त्यावेळी ती आत्महत्या मानली गेली होती.



भट यांचा मृतदेह दादर आणि माटुंगा दरम्यानच्या रेल्वे रुळांवर आढळला होता. त्यावेळी दादर रेल्वे पोलिसांनी या घटनेची अधिकृतपणे "अपघाती मृत्यू" अशी नोंद केली होती. मात्र, २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या अब्दुल वाहिद शेख यांनी त्यांच्या 'बेगुनाह कैदी (निरपराध कैदी)' या पुस्तकात एक धक्कादायक दावा केला आहे. शेख यांच्या मते, भट यांनी त्यांच्याशी बोलताना कबूल केले होते की, त्यांना आरोपींविरुद्ध खोटे पुरावे तयार करण्यासाठी आणि खोटे साक्षीदार उभे करण्यासाठी दबाव आणला जात होता.


वृत्तानुसार, भट यांनी आपल्या ड्रायव्हरला टिळक ब्रिजवर सोडण्यास सांगितले होते. तिथे त्यांनी आपल्या वैयक्तिक वस्तू ड्रायव्हरकडे दिल्या, केवळ आपले ओळखपत्र (ID) स्वतःजवळ ठेवले, आणि त्या वस्तू आपल्या पत्नीला देण्याचे निर्देश दिले. पुस्तकातील या उल्लेखामुळे भट यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची अधिक वाच्यता न करता अपघाती मृत्यू म्हणून प्रकरण तिथेच संपवून टाकले.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या