मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Pandey) सख्खा भाऊ अहान पांडेनं (Ahaan Pandey) ‘सैय्यारा’ (Saiyaara) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अहानच्या करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळचं आणलाय असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये त्याच्यासोबत अनीत पड्डा या (Anit Padda) अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या अहान पांडेच्या 'सैयारा' या पदार्पणाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹२१.२५ कोटींचे कलेक्शन केले आहे. ज्यामुळे हा चित्रपट कोणत्याही स्टार किडच्या पदार्पणातील आजपर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २४ कोटी रुपयांचा बंपर गल्ला कमावलाय. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा ४५ कोटींवर पोहोचला आहे. ज्या गतीने या चित्रपटाची कमाई सुरू आहे, ते पाहून पहिल्याच वीकेंडच्या कमाईचा आकडा ७५ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.
मुंबई: मुंबईला हादरवून सोडणाऱ्या २००६ च्या ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींच्या अपीलवर आणि फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणावर मुंबई उच्च ...
'सैयारा'नं तिसऱ्या दिवशी किती कमाई केली?
मोठ्या मोठ्या सुपरस्टारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जे करता आलं नाही, ते 'सैयारा' चित्रपटानं केलं. नवखे सिनेस्टार्स असूनही विक्की कौशलच्या सुपरहिट 'छावा' नंतर, हा चित्रपट २०२५ मध्ये तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालणारा दुसरा चित्रपट आहे. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन यशराज फिल्म्स निर्मित आणि मोहित सुरी यांनी केलेलं असल्यानं, त्याबद्दल आधीच चर्चा होती.
- सैयारा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी २१ कोटींचा व्यवसाय केला.
- दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने १९.०५ टक्के वाढ दाखवली आणि २५ कोटींची कमाई केली.
- त्याच वेळी, सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सैयारा'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी ३७ कोटींची कमाई केली आहे,
यासह, 'सैयारा'नं तीन दिवसांत ८३ कोटींची कमाई केली.
‘सैय्यारा’ने पहिल्या २ दिवसांत या चित्रपटांची केली बत्ती गुल
- 'दृश्यम २'नं तिसऱ्या दिवशी २७.१७ कोटी रुपये कमावले.
- 'सिंघम अगेन'नं तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी रुपये कमावले.
- 'भूल भुलैया ३' नं तिसऱ्या दिवशी ३५.५ कोटी रुपये कमावले.
- 'कबीर सिंग'चा तिसऱ्या दिवसाचा व्यवसाय २७.९१ कोटी रुपये होता.
- 'मेरे हसबंड की बिवी'नं तिसऱ्या दिवशी १२.२५ कोटी रुपये कमावले
- 'सितारे जमीन पर'नं तिसऱ्या दिवशी २७ कोटी रुपये कमावले.
- 'माँ'नं तिसऱ्या दिवशी ३८.५१ कोटी रुपये कमावले.
- 'कल्की २८९८ एडी'नं तिसऱ्या दिवशी २६ कोटी रुपये कमावले.
- 'इमर्जन्सी'नं तिसऱ्या दिवशी २०.४८ कोटी रुपये कमावले.
- 'सैयारा'ची पहिल्या आठवड्यात बजेटपेक्षा जास्त कमाई.