'Prahaar Exclusive' Brigade Hotel Ventures IPO : कंपनीचा आयपीओ २४ जुलैपासून कंपनी म्हणाली आम्ही...

मोहित सोमण: गेल्या पंधरा वर्षांत आमच्या कंपनीची टॉपलाईन वाढ (Topline Growth) २३% अधिक झाली आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या समुहाचे व्यवस्थापन केल्याने आम्ही वाढत आहोत. खासकरून कोविड काळानंतर उद्योग विश्वाची डायनॅमिक्स बदलली आहेत. या गतीमानतेबरोबर कंपनीही वाढत असून आपण आकडेवारी पाहिल्यास हॉस्पिटॅलिटी व हॉटेल इंडस्ट्रीत मोठी वाढ झाली आहे. आम्ही गेल्या १६ वर्षात जे साध्य केले ते पुढील पाच वर्षांतही साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत आम्ही नवीन ५ हॉटेल्स उघडण्यासाठी इच्छुक आहोत. आमच्या ग्रुपचा दक्षिण भारतातील दुसरा क्रमांक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहे व दुसरीकडेही चांगल्या संधीसाठी आम्ही इच्छुक असतो.' असे विधान ब्रिगेड हॉटेल वेंचर्स लिमिटेड (Brigade Hotel Ventures Limited) कंपनीच्या कार्यकारी संचालिका निरूपा शंकर यांनी केले आहे. कंपनीने बाजारात आयपीओ आणण्याचे ठरवले आहे. त्याविषयी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कंपनीने ८५ ते ९० रूपये प्रति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित केला आहे. २४ जुलै ते २८ जुलैपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. आयपीओ बिडिंगसाठी खुला होण्यापूर्वी २३ जुलैला अँकर गुंतवणूकदारांकडून निधी मिळवणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या घोषणेच्या वेळी कार्यकारी संचालक एम आर जयशंकर व कंपनीचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,आयपीओतील बिडिंगसाठी १६६ इक्विटी शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत तर त्यानंतर १६६ शेअरने मल्टिपल खरेदी करावे लागतील. जेएम फायनांशियल लिमिटेड कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर किनफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, २९ जुलैपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) होऊ शकते. साधारणतः कंपनी ३१ जुलैला सूचीबद्ध (Listed) होणार आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, ७५९.६० कोटी मूल्यांकनाचा हा आयपीओ असणार आहे जो बीएसई (BSE), एनएसई दोन्ही एक्सचेंजवर सूचीबद्ध होईल. या आयपीओत गुंतवणूक करताना किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४११० रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य असेल. ८ लाख ४४ हजार समभागांचा हा फ्रेश इशू असणार आहे.

माहितीनुसार एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Investors QIB) यांच्यासाठी ७५% पर्यंत वाटा, किरकोळ गुंतवणूकदारां साठी (Retail Investors) १०% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५% पर्यंत वाटा गुंतवणूकीस‌‌‌ उपलब्ध असेल. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तक (Promoter) यांचे भागभांडवल (Stakes) ९५.२६% होते जे आयपीओनंतर ७४.०९% वर खाली येऊ शकते. कंपनीच्या माहितीनुसार, ३ रूपयांपर्यंत प्रति शेअरमागे सवलत कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना मिळेल.

कंपनी मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात विस्तार करत आहे. 'आम्ही भारताच्या वाढत असलेल्या ग्रोथ स्टोरीचा हिस्सा बनण्यास इच्छुक आहोत. या वाढत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आम्ही आमचे योगदान देऊ इच्छितो आम्ही आमच्या समुहाच्या पंचतारांकित हॉटेलांसह जगभरातील दिग्गज ब्रँडसह भागीदारी करत आहोत जेणेकरून त्यांच्या नेटवर्किंगचा अनुभव आमच्याही पाठीशी राहिल.' असे निरूपा शंकर म्हणाल्या आहेत.

कंपनीच्या विस्ताराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,' २००९ साली आमच्या कंपनीच्या सुरूवातीच्या काळापासून कंपनीने चांगली आर्थिक वाढ दर्शविली असून आम्ही आमच्या चेनचा विस्तारही केला. मिड लक्झरी, लक्झरी, हाय ऐंड लक्झरी अशा विविध प्रकारच्या हॉस्पिटॅलिटीत आमचा समावेश आहे.आम्ही मायक्रो व्यवस्थापनाच्या आधारे ही प्रगती केली असून आम्ही निधीचा सदुपयोग केला आहे. अनेक कंपन्यांच्या आयपीओनी विशेषतः मध्यम व लघू भांडवली कंपन्यांच्या आयपीओची कामगिरी विशेष राहिली नाही. ब्रिगेड वेंचरने मात्र मागील आर्थिक वर्षातही चांगली कामगिरी केल्याने कंपनी बाजारात विस्तारासाठी आयपीओ लाँच करत आहे.

सध्याची बाजाराची अस्थिर परिस्थिती पाहता पुढच्या १० वर्षासाठी फंडामेंटल व टेक्निकलमधील अशा कुठल्या बाबींकडे बघत किरकोळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी असा प्रश्न विचारला असता 'प्रहार' न्यूजशी बोलताना ब्रिगेड हॉटेल वेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका निरूपा शंकर म्हणाल्या,'आम्ही चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. भारतीय परिपेक्षात याचा वि चार केल्यास देशातील आमच्या पोर्टफोलिओत गुणात्मक वाढ दर्शविली आहे. मागणी पुरवठा गुणोत्तर अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय बाजारात काम करत आहे. हॉस्पिटॅलिटी व हॉटेल क्षेत्रा नेही देशात चांगली कामगिरी केली. भारतात टुरिझमचाही विस्तार होत आहे.

आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मागणी पाहता अजून खूप मोठी संधी विस्तारासाठी आहे. अजून ती संभाव्य संधी आहे. आमच्या कंपनीबाबत बोलायचे झाल्यास आमची कामगिरी अधोरेखित करते की आम्ही चांगली कामगिरी केली जी गेल्या १६ वर्षात केली ती पुढील पाच वर्षांही कायम राहील. बाकी आम्ही विचारमंथन किरकोळ गुंतवणूकदाराकडे सोपावतो. सर्वात अधिक फायदा आमच्या बाबत हा आहे की, आमची मुख्य कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे ज्याचे पाठबळ आहे.कोस्ट टू व्हॅल्यु ही आमची विशेषता असून आमची टीम अनुभवी आहे. आम्हाला नक्की माहितीये आम्हाला काय साध्य करायचे आहे आम्ही एक उद्दिष्ट ठेवून पुढे चालत आहोत. त्यामुळे आम्ही आश्वस्त आहोत की भविष्यातही आम्ही चांगलीच कामगिरी करू बाकी सकारात्मक विचार मंथन किरकोळ गुंतवणूकदारही करतील.'

कंपनीबद्दल -

ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेड ही भारतातील प्रमुख शहरांमध्ये, प्रामुख्याने दक्षिण भारतातील हॉटेल्सची मालकी आणि विकासक (Real Estate Company )आहे. ही कंपनी BEL (Brigade E nterprise) ची पूर्ण मालकीची उपकंपनी (Subsidiary) आहे, जी भारतातील आघाडीच्या भारतीय रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे.

हॉटेल्सची साखळी चेन (Chain of Hotels) असलेल्या कंपनीकडे दक्षिण भारतात (केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप, अंदमान आणि निको बार बेटे आणि पाँडिचेरी या राज्यांचा समावेश असलेले) प्रमुख खाजगी हॉटेल मालमत्ता मालकांमध्ये (म्हणजेच, संपूर्ण भारतात किमान ५०० खोल्याहून अ़धिक रूम्स कंपनीच्या पोर्टफोलिओत आहेत.  ही हॉटेल्स ग्राहकांना प्रफुल्लित जागा, उत्तम जेवणाचे आणि विशेष रेस्टॉरंट्स, बैठकांसाठी ठिकाणे, प्रोत्साहने, परिषदा आणि लाउंज, स्विमिंग पूल, बाहेरील जागा, स्पा आणि व्यायाम शाळा यासह व्यापक अनुभव प्रदान करतात.

कंपनीकडे बेंगळुरू (कर्नाटक), चेन्नई (तामिळनाडू), कोची (केरळ), म्हैसूर (कर्नाटक) आणि गिफ्ट सिटी (गुजरात) येथे नऊ हॉटेल्स आहेत ज्यात १,६०४ चाव्या (Keys) पोर्टफोलिओत आहेत. कंपनीची हॉटेल्स मॅरियट, अ‍ॅकोर आणि इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुप सारख्या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी कंपन्यांद्वारे चालवली जातात.

कंपनीची आर्थिक स्थिती -

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३१ मार्च २०२४ मधील ४०४.८५ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला होता जो ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढत ४७०.६८ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये मार्च २०२४ मधील मार्च २०२५ पर्यंत ३१.१४ कोटींच्या तुलनेत घसरत २३.६६ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीच्या ईबीटी (करपूर्व कमाई EBITDA) यामध्ये मार्च २०२४ मधील १४४.६१ कोटींच्या तुलनेत वाढत १६६.८७ कोटींवर गेली होती. सध्या कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ३४१८.४७ कोटी रुपये आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील निधीचा वापर आपल्या थकबाकी चुकवण्यासाठी, प्रवर्तक कंपनी बीइएल मध्ये शेअर खरेदीसाठी, दैनंदिन कामकाजासाठी, व भावी अधिग्रहणासाठी, विस्तारासाठी वापरण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

आनंदाची बातमी, लाखो लोकांना पक्की घरं मिळणार !

प्रतिनिधी: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत

अभिमानास्पद! GII १३९ देशांमध्ये भारत ३९ व्या क्रमांकावर पोहोचला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी:प्रसिद्ध जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशनह इंडेक्स २०२५ (Global Innovation Index GII)मध्ये भारत १३९