Viral Video : मालकाचा निर्लज्जपणा, ११ वर्षाच्या मुलावर सोडला पिटबुल; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द पोलीस स्टेशन परिसरातील PMGP म्हाडा कॉलनीतून एक अतिशय थरकाप उडवणारी आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं रिक्षात खेळणाऱ्या ११ वर्षीय मुलावर पिटबुल जातीचा कुत्रा सोडला. या कुत्र्यानं मुलाचा चावाही घेतला. विशेष म्हणजे आजूबाजूचे लोकं हे पाहून या गोष्टीची मजा घेत होते, व्हिडीओ शूट करत होते. तर त्या रिक्षातच बसलेला पिटबुल कुत्र्याचा मालक मात्र हे सगळम पाहून निर्लज्जपणे हसत राहिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपासही सुरू केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या पीडित मुलाच्या कुटुंबीयांकडून मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.




नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन ११ वर्षीय मुलगा १७ जुलै २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास बिल्डिंग नंबर ९१ ए च्या समोर उभ्या असलेल्या रिक्षात खेळत होता. त्याचवेळी त्या परिसरात राहणारा मोहम्मद सोहेल हसन खान याने त्याचा पाळीव, पिटबूल कुत्र्याची लीश काढून त्याला मोकाटपणे सोडलं. गुरुवारी रात्री मानखुर्द परिसरात ही घटना घडली. पिटबुल कुत्र्याने ११ वर्षीय मुलावर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक व्यक्ती चिमुकल्यावर कुत्रा सोडते, तो कुत्रा मुलाचे लचके तोडत असताना हसत बसते. त्यावेळी आजुबाजुला असलेले लोक मदत करण्याऐवजी गंमत बघत असल्यासारखं बघ्याच्या भूमिकेत होते. काहींनी त्याचे व्हिडीओ काढले. मालकाचा कुत्रा रिक्षात शिरला आणि त्याच्या मागे त्याचा मालकही रिक्षात बसला. त्यानंतर त्या पिटबुलने रिक्षात खेळणाऱ्या लहान मुलावर हल्ला केला आणि त्याला चावला.



या हल्ल्यामुळे अतिशय घाबरलेला हमझा रडू लागला आणि मदतीसाठी ओरडू लागला, तो गयावया करत होता. मात्र हे सगळं पाहून त्या कुत्र्याचा मालक असलेल्या हम्मद सोहेल हसन खान याला जराही दया आली नाही. उलटं तो हा सगळा प्रकारची मज्जा घेत होता, आणि हसतही होता. काही सेकंदांनंतर तो मुलगा जोरजोरात ओरडू लागला आणि त्या पिटबुलने त्याच्या हनुवटीचा चावा घेतला तरीही कोणीही त्याच्या मदतीसाठी आलं नाही. अखेर तो मुलगा कसातरी खाली उतरला आणि घराच्या दिशेने धावत सुटला. मात्र लीश काढून मोकळ सोडल्यामुळे तो पिटबुलही त्याच्या मागे धावत होता. सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे अवघ्या ११ वर्षांच्या मुलाचे हे हाल पाहून कोणालाच दया आली नाही, आजूबाजूचे लोक चक्क या घटनेची मस्तपैकी मजा घेत होते, हसत हसत कॉमेंट्स करत व्हिडीओ शूटिंगही करत होते.




पोलिसांनी पिटबुलच्या मालकाला दिलं सोडून


दुसऱ्या दिवशी, १८ रोजी, त्याचे कुटुंबीय, आपल्या मुलाला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे त्यांनी आरोपी मोहम्मद सोहेल हसन खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी मोहम्मद सोहेल खानला बीएनएसच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी सोडून दिले आणि अटक करण्यात आली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या कुत्र्याच्या मालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम २९१, १२५ आणि १२५ (A) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)