Mastek Share Surge: मस्टेक कंपनीच्या शेअर्समध्ये संध्याकाळपर्यंत ७.०८% उसळी 'या' कारणामुळे !

प्रतिनिधी:मस्टेक (Mastek Limited) या सॉफ्टवेअर कंपनीचा शेअर दिवसाअखेरीस ७.०८% उसळत २६७०.१० रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे.शेअर सकाळच्या सत्रात ११.२६% टक्क्या ने उसळला होता. सत्राच्या सुरुवातीला बाजार उघडल्यावरच कंपनीच्या शेअर्सने ९% पेक्षा अधिक उसळत आपली कामगिरी उंचावली आहे. कंपनीच्या सकारात्मक निकालाने ही वाढ मानली जा त आहे. कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीला पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २९% वाढ झाल्याने हा भावनात्मक कौल कंपनीला गुंतवणूकदारांकडून मिळाला.

कंपनीच्या शेअर्सनी दोन महिन्यांचा एप्रिलच्या नीचांकी पातळीवरून (All time Low) वरून वाढत ३८ टक्क्यांहून अधिक वधारला आहे . एनएसईतील निफ्टीत या समभागात (Stocks) ६ टक्के वाढ झाली होती, तर या एकूणच वर्षभरात हा शेअर ९% घसरला मास्टेकचे एकूण बाजार भांडवल ८,४२९.६१ कोटीवर पोहोचले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १०.०५% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर २७४४.२० रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता.

मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७१.५ कोटींचा निव्वळ नफा झाला होता जो या वर्षीच्या तिमाहीत वाढत ९२ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीच्या करपूर्व कमा ईत (EBITDA) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील १२३.८ कोटींच्या तुलनेत वाढ होत या तिमाहीत १३७.३ कोटींवर कमाई पोहोचली आहे. मात्र कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये गेल्या वर्षीच्या ति माहीतील १५.२% वरून घट होत यंदाच्या तिमाहीत १५.१% घसरण झाली आहे. कंपनीच्या महसूलातही मागील तिमाहीतील १२.५% वाढ झाली आहे. मागील तिमाहीत महसूल ८१२.९ कोटी होता जो वाढत ९१४.७ कोटींवर पोहोचला आहे. यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

IND vs PAK: मैदानावरही ऑपरेशन सिंदूर!' पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर विजयानंतर केले खास ट्विट

नवी दिल्ली: भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर

फ्लॅटमध्ये आग लागल्याने या अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या कोटा येथे एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत अभिनेत्री रीता शर्माच्या दोन मुलांचा गुदमरून

लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त ‘१२० बहादुर’चा दुसरा टीझर प्रदर्शित

मुंबई : भारताची स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांनी

IND vs PAK Final: फायनलच्या आधी टीम इंडियाला मोठा झटका

दुबई: आशिया कपचा फायनल सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि

प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर

IND vs PAK Final : भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल!

४१ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; २८ हजार क्रिकेट चाहत्यांची गर्दी, महागडी प्रीमियम तिकिटे अजूनही