बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा

मुंबई : बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक २२ जुलै २०२५ रोजी करीयर मार्गदर्शन, प्लेसमेंट ड्राईव्ह व पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २२/०७/२०२५ रोजी MMP Shaha Woman College, Matunga East येथे सकाळी १०.३० ते १२.३० वा. करीयर मार्गदर्शन व धारावी मिशन सेंटर, गणेश विद्या मंदिर धारावी येथे दु.०२.०० ते ०५.०० प्लेसमेंट ड्राईव्ह तसेच Sharda Mandir High School, Grant Road, Mumbai ४०० ००७ दुपारी ०३.०० ते दुपारी ०५.३०, वाजेपर्यंत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


अद्याप सदर करीयर मार्गदर्शन, प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे तसेच प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे.


भरती नियोक्ते इच्छुक पदे यांनी जास्तीत जास्त रिक्त https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर “Pandit Dindayal Upadhyay Job Fair” ऑप्शनवर क्लिक करुन “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व २२ जुलै २०२५ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या श्री. खालकर मो.न.८९९९६९१५१५ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.


वरील कार्यक्रमांचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन  शैलेश भगत, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका