Gold Price Today: सलग चौथ्यांदा सोन्यात तुफानी 'हे' आजचे दर ! का सोने सातत्याने वाढत आहे जाणून घ्या

प्रतिनिधी: सलग चौथ्यांदा सोन्यात तुफानी वाढ झाली आहे. शनिवारी सोन्याने नवा उच्चांक प्रस्थापित केला होता तब्बल एक लाखाहून अधिक रूपयांनी सोने वधारले असताना आजही सोने उसळले आहे. ' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११ रूपयांने वाढत सोने १००१५ रूपये प्रति ग्रॅम पातळीवर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपये वाढ झाल्याने दरपातळी ९१८० रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८ रूपयांने वाढ झाल्याने दरपातळी ७५११ रूपयांवर पोहोचली आहे.


माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११० रूपये वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०० रूपयांनी वाढ झाली आहे तर १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८० रूपये वाढ झाली आहे. परिणामी सोन्याची तोळ्यामागे दरपातळी २४ कॅरेट १००१५० रूपयांवर, २२ कॅरेट ९१८०० रूपयांवर, १८ कॅरेट ७५११० रुपयांवर पोहोचले आहे.


सोन्याच्या जागतिक पातळीवरील निर्देशांकात म्हणजेच गोल्ड फ्युचर निर्देशांकात आज सकाळी ११ वाजेपर्यंत ०.४९% वाढ झाली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.५०% वाढ झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ३३६७.४० औसंवर गेली आहे. भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकातही ०.५०% वाढ झाल्याने दरपातळी ९८५११.०० पातळीवर गेली.


मुंबईसह भारतातील अहमदाबाद, दिल्ली वगळता इतर प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १००१५ रूपये, २२ कॅरेटसाठी ९१८० रूपये दर सुरू आहे. भारतीय सराफा बाजारात प्रामुख्याने आज झालेली वाढ ही जागतिक निर्देशांकातील वाढीमुळे झालेली आहे. अस्थिरतेत सोन्यातील गुंतवणूकीला महत्व मिळाल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने दरवाढ होत आहे.


खासकरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या १ ऑगस्ट अतिरिक्त टेरिफ वाढीच्या अंतिम मुदतीपूर्वी गुंतवणूकदार जागतिक बाजारपेठेत लक्ष ठेवून आहेत.अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक युरोपियन युनियनशी करार करण्याबाबत आशावादी होते त्यांना तसे विधान केले होते मात्र फेडकडून कुठलेमी नवे विधानं अजून न आल्याने यावर निश्चित बदल अपेक्षित नाही. ट्रम्प ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेला जाण्यापूर्वी चीनला जाण्याची शक्यता आहेत. आजही डॉलरच्या तुलनेत रुपयाची २० पैशाने सकाळी घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतीला भारतीय बाजारपेठेत आधार मिळू शकला नाही.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७