Bangladesh Plane Crash: बांगलादेश हवाई दलाच्या विमान अपघातातील मृतांचा आकडा १९ वर, १६४ जखमी

बांगलादेश सरकारकडून एक दिवसाचा राज्य शोक जाहीर 


ढाका: बांगलादेश हवाई लाचे एफ-७बीजीआय प्रशिक्षण विमान अपघाताची भीषणता आता समोर आलेली आहे. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे तर १६४ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात ६० हून अधिक जखमींना बर्न इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या अनेकांवर उत्तरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बांगलादेश सरकारने देशात एक दिवसाचा राज्य शोक जाहीर केला आहे.


ढाका येथील उत्तरा भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दुपारी हे विमान कोसळण्याची घटना घडली आहे. विमान दुर्घटनेवेळी शाळा आणि महाविद्यालय वर्ग सुरु होते, त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने मुले उपस्थित होती. माइलस्टोन कॉलेजमधील एका शिक्षकाने सांगितले की, विमान तीन मजली शाळेच्या इमारतीच्या समोर आदळले तेव्हा ते कॉलेज इमारतीजवळ उभे होते आणि त्यात अनेक विद्यार्थी अडकले होते. कॉलेजचे शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धावले. त्यानंतर काही वेळातच लष्कराचे सदस्य पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्यात सहभाग घेतला.



बांगलादेश संरक्षण मंत्रालयाचे निवेदन जाहीर


बांगलादेशच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "दुपारी १:०६ वाजता एक एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले आणि काही वेळातच ते कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले." अपघातानंतर विमानाला आग लागली. दूरवरून धुराचा लोट दिसत होता. आग विझवण्यासाठी अग्निशमन सेवेच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.



चिनी बनावटीचे होते विमान


एफ-७बीजीआय हे बांगलादेश हवाई दलाचे बहुद्देशीय लढाऊ विमान आहे. हे चीनच्या चेंगडू जे-७ लढाऊ विमानाची प्रगत आवृत्ती आहे. सोव्हिएत युनियनच्या मिग-२१ च्या धर्तीवर बनवले गेले होते. बीएएफने हे लढाऊ विमान २०११ ते २०१३ दरम्यान खरेदी केले होते. ते थंडरकॅट स्क्वॉड्रनमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. एफ-७ बीजीआय विमान एकाच वेळी ६०० ते ६५० किमी पर्यंतचा लढाऊ पल्ला पार करू शकते, तर फेरी पल्ला २,२३० किमी पर्यंत आहे. ते जास्तीत जास्त १७,८०० मीटर उंचीपर्यंत उडू शकते. या लढाऊ विमानात २ तोफांसह ७ शस्त्रे बसवण्याचे बिंदू आहेत. त्यावर ३ हजार किलोग्रॅम वजनाचे क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब बसवता येतात. ते पीएल-५ आणि पीएल-९ क्षेपणास्त्रे, लेसर गाइडेड बॉम्ब आणि सी-७०४ जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.

Comments
Add Comment

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका