पुण्यातील बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

पुणे : शहरातील बुधवार पेठेत परिसरातील रेड लाइट एरियात असलेल्या मालाबाई वाड्यावर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली. यावेळी अवैधरीत्या देशात वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी देशात येताना पश्चिम बंगाल येथील नागरिक असल्याचा बनाव केल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले आहे.


जहानारा मजिद शेख (४५, रा.मूळ जैशोर, खुलना), शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (२८, मूळ, ढाका), नुसरात जहान निपा (२८, रा.मूळ, नारायणगंज), आशा खानामइयर अली (३०, रा.मूळ, नोडाई, कालिया) आणि शिल्पी खालेकमिया अक्तर (२८, रा.रायपुरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.



या महिलांनी बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला. तसेच पुण्यात त्या वेश्या व्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यांच्यावर विविध कलमांन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. यावेळी या महिला बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने देशात दाखल झाल्याचे आणि वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई