WLC 2025 : भारतीय खेळाडूंचा पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय, आजचा सामनाच रद्द होण्याची शक्यता

  75

तीव्र विरोधानंतर हरभजन सिंगसह पठाण बंधुंची सामन्यातून माघार


लंडन: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला १८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत ७ संघातील माजी खेळाडू एकमेकांसमोर भिडणार आहेत. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने इंग्लंड चॅम्पियन्सवर मात करत विजयी सलामी दिली. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष  आज २० जुलै रोजी बर्मिंगहॅम  येथे होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे.  मात्र दुसर्‍या बाजूला या सामन्याला भारतीयांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या तीव्र विरोधानंतर भारताच्या माजी खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.



गौतम गंभीरच्या कोचकडून संताप


दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर यांच्या बालपणीचे कोच संजय भारद्वाज यांनी पाकिस्तान विरूद्धच्या या सामन्यात सहभाग घेण्यावरुन खेळाडूंवर संताप व्यक्त केला. “यांना फक्त पैसा हवाय”, अशा शब्दात भारद्वाज यांनी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची कानउघडणी केली.



पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह याने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे. हरभजन या स्पर्धेतील पहिल्या पर्वातही सहभागी झाला होता. मात्र पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला वाढता विरोध पाहता हरभजनने माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.


तसेच या सामन्यातून इरफान आणि युसूफ या पठाण बंधुंनीही माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या काही महिन्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात सामन्याचं आयोजन करण्यात आलंय.या सामन्यात भारतीय खेळाडू कोणताही आक्षेप न घेता खेळण्यास तयार असल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. या तीव्र विरोधानंतर अखेर भारतीय खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.


पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचे अनेक व्यवहार बंद करत आर्थिक कोंडी केली. मात्र या दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याच्या आयोजनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच खेळाडूंनीही कोणताही विरोध न दर्शवता सहभाग घेतल्याने चाहत्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. त्यानंतर वाढता विरोध पाहता भारताच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सामनाच रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय