भविष्यातील नोकऱ्यांसाठी आत्ताच अभ्यास करा: नितेश राणे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव


सिंधुदुर्ग : देशाची पुढील २५ वर्षांतील प्रगती कोणत्या क्षेत्रात होणार आहे, याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्यानुसार शिक्षण घ्यावे आणि आपल्या भविष्यातील नोकऱ्या व उद्योग उभे करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मराठा समाज सभागृहात हा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे बंड्या सावंत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक विनीत परब, कॉमर्स अकॅडमी संचालक सीताराम प्रभूदेसाई, शहर मंत्री दिग्विजय पवार, कार्यक्रम प्रमुख आर्या सावंत, सह शहर मंत्री अलविना फर्नांडिस आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे कौतुक


या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, या व्यासपीठावरून अनेक कार्यकर्ते, नेते, चांगले नोकरदार आणि उद्योजक घडले आहेत. त्यामुळे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना घडवणारे आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः पुढील काळात कोणत्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी आताच करून त्यानुसार शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. सध्या एआय शिक्षण पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण या क्षेत्रात भविष्यकाळात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रात स्पर्धाही वाढणार आहे, याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे.

विद्यार्थीच देशाचे भविष्य आहेत


राणे पुढे म्हणाले की, अशा कार्यक्रमांकडे मी एक गुंतवणूक म्हणून पाहतो कारण हे विद्यार्थीच देशाचे भविष्य आहेत. भारत हा सर्वात तरुण देश म्हणून भविष्यात उदयास येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे उद्योग उभे केले जाणार आहेत त्या उद्योगांमध्ये या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाईल. यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्याचा शासनाचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रात वाढ होत आहे, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. मुंबईला जाण्याऐवजी आपल्या जिल्ह्यात आई-वडिलांसोबत राहून व्यवसाय आणि नोकऱ्या करणे अधिक चांगले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Add Comment

उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील

"हो, आम्ही लग्न केलं" - सारंग साठ्ये आणि पॉला विवाहबद्ध !

मुंबई : प्रसिद्ध विनोदी कलाकार, दिग्दर्शक आणि अभिनेता सारंग साठ्ये याने त्याची १२ वर्षांची साथीदार पॉला

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडला

नवी दिल्ली : राजस्थानमधील नागौर येथील देगाना प्रदेशात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे. या खनिजाला पांढरे सोने

लंडनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, भारतीय उच्चायोगाने घेतला तीव्र आक्षेप

लंडन: ब्रिटनची राजधानी लंडनमधील टाविस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात

मेलोनींच्या आत्मचरित्राला पंतप्रधान मोदींची प्रस्तावना

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया - माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या