शिवाजीपार्कचा कट्टा आता बसण्यास अयोग्य

कट्टयाच्या सुखद आठवणी, आता ठरतायत दु:खद


मुंबई : दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजीपार्काच्या कठड्यांवरील अनेकांच्या वेगवेगळ्या भावना तसेच आठवणी आहेत. या कठड्यांवर बसून अनेकांच्या गप्पांच्या मैफिली रंगल्या आहेत, मग ते ज्येष्ठांच्या असो वा तरुणांच्या. शिवाजीपार्कचा हा कट्टा अनेकांच्या आठवणींचा ठेवा आहे. परंतु आता याच कट्टयांवर बसताना अनेकांना शंभरदा करावा लागत आहे. या कट्टाच आता अनेकांना टोचू लागला असून क्षणभर विसावा घेण्यासाठीही या कट्टयांवर बसण्याची नागरिकांची इच्छा होत नाही. त्यामुळे अनेकांना हा कट्टा सुखद आठवणींना वाटत असला तरी आता मोठा हा दु:खद कट्टा वाटत आहे. मुंबईतील ऐतिहासिक दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क या मैदानाला शंभरपेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहे. या मैदानाने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत आणि आजही हे शिवाजी पार्क मैदान मुंबईकरांसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.


शिवाजी पार्क हे केवळ खेळाचे मैदान नसून, ते सकाळ-संध्याकाळ शतकानुशतके फिरायला येणाऱ्या लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने येथे येतात. तुटलेल्या कठड्यांमुळे पाय घसरून पडण्याचा किंवा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मैदानाच्या भोवताली असलेले कठडे (रेलिंग्स) सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. मैदानाच्या सभोवताली असलेल्या काँक्रिटच्या कठड्यांवर सिरॅमिक लादीचे तुकडे बसवण्यात आले होते. हे लादीचे तुकडे आता उखडत चालले असून या उखडल्या गेलेल्या तुकड्यांमुळे या कट्ट्यांवर बसवण्याची कुणाचीही इच्छा होत नाही. या कठड्यावर सकाळ आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना बसून गप्पा मारण्याचीही इच्छा होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी उखडलेल्या लाद्यांच्या तुकड्यांमुळे याठिकाणी नागरिकांना निट बसताही येत नाही. तसेच बसल्यानंतर तुटलेल्या लांद्यांचे तुकडे हाताला लागू रक्त येणे, जखम होणे असे प्रकार घडत आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह इथे येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे.



सुरक्षितता जपण्याची प्रशासनाची जबाबदारी


काही महिन्यांपूर्वी मैदानावरील धुळीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या होत्या आणि मैदान हिरवेगार करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या कठड्यांच्या दुरुस्तीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मैदानाचे सौंदर्यीकरण करताना, त्याची मूळ रचना आणि सुरक्षितता जपण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.



कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी


सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिवाजी पार्कच्या सर्व कठड्यांची पाहणी करून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन दिले आहे. मैदानाची ऐतिहासिक ओळख आणि महत्त्व लक्षात घेता, प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष संतोष साळी यांनीही महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना निवेदत देत या कठड्यांवर बसवण्यात आलेल्या आयताकृती सिरॅमिक टाईल्सचे निखळलेले तुकडे पूर्णपणे काढून टाकत नव्याने बांधणी सुरु आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.