वांद्रे रेल्वे स्थानकावर ‘रेल कोच रेस्टॉरंट’ सुरू

२४ तास खुले रेस्टॉरंट


मुंबई : प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सोयीस्कर अनुभव देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत, पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाने शनिवारी वांद्रे स्थानकावर "रेल्वे कोच रेस्टॉरंट" सुरू केले. या रेस्टॉरंटचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. हे रेस्टॉरंट 'वांद्रे स्टेशन महोत्सव'च्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.


हे नवीन रेल कोच रेस्टॉरंट प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा पुरवण्याच्या पश्चिम रेल्वेचे पुढचे पाऊल आहे . एका बंद पडलेल्या रेल्वे कोचचे अत्याधुनिक आणि सुसज्ज वातानुकूलित रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करून त्याला एक अनोखा लूक देण्यात आला आहे. या उपक्रमात वारसा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ सादर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना आणि सामान्य लोकांना एक विशिष्ट आणि आरामदायी जेवणाचा अनुभव मिळतो. हे रेस्टॉरंट २४ तास खुले असेल आणि त्यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ दिले जातील, जे दररोज प्रवास करणारे, पर्यटक आणि खाद्यप्रेमींच्या विविध आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार केले जातील.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या