इको-सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यासाठी आग्रही

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा इशारा


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सिटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र सरकारच्या मसुद्यामध्ये आहेत. त्यात रोहा तालुक्यातील ११९ गावे वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यावर हरकती घेत इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेकापने केली आहे. शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुका वन उपविभागीय अधिकारी डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी शेकापने पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


रोहा तालुका हा औद्योगिक एमआयडीसी असलेला तालुका आहे, तसेच मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या जवळ असलेला तालुका आहे. रोहा तालुक्यालगतचे अलिबाग, पेण तालुके एमएमआरडी क्षेत्रात आहेत. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदाल ड्रिलिंग, विभोर स्टील हे कारखाने आहेत, तर धाटाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ५० रासायनिक कारखाने आहेत. तसेच रोहा तालुका हा भात उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. रोह्याचा पोहा हा देशभरामध्ये जातो, तसेच शेतीपुरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला शेतीचे व्यवसाय केले जातात.


पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीर उद्योग करता येणार नाहीत. स्वतःची मालकीची जमीन असूनदेखील कुक्कुटपालन, वीट व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यशेती व्यवसायदेखील शेतकऱ्यांना करता येणार नाहीत व जमिनी विकसित करता येणार नाहीत, तसेच शेतघरे, गुरांचे मोठे, स्वयंरोजगाराचे लघु व कुटिर उद्योग करता येणार नाहीत. त्यामुळे रोहे तालुक्यातील ११९ गावांतील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

महिला क्रिकेट विश्वचषक: पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही, भारत-पाक सामन्यांबाबत नवा नियम

नवी दिल्ली: भारतामध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात पाकिस्तानचा संघ सहभागी