भारताने विकसित केली मलेरिया प्रतिबंधक लस


नवी दिल्ली : भारताने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसचे नाव एडफाल्सीवॅक्स असे ठेवण्यात आले आहे. ही लस मलेरियाला प्रतिबंध करेल आणि मलेरियाच्या प्रार्दुभावाला आळा घालण्यासही मदत करेल. यामुळे भारतातून लवकरच मलेरिया या आजाराने उच्चाटन करणे शक्य होईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.


आयसीएमआरने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केल्याचे जाहीर केले आहे. डासांमुळे भारतात दरवर्षी अनेकजण आजारी पडतात. यातील काही जणांचा मृत्यू होतो. पण मलेरियाला प्रतिबंधक लसमुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होणार आहे. भारतात डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही लस विकसित करण्याचे काम सुरू आहे.


भारताने विकसित केलेली मलेरिया प्रतिबंधक लस अर्थात एडफाल्सीवॅक्स परजीवी प्लास्मोडियम फाल्सीपेरमवर कमालीची प्रभावी ठरली आहे. लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात मलेरियाशी संबंधित परजीवी सक्रीय होऊ शकत नाही. यामुळे संबंधित व्यक्तीला मलेरिया होत नाही तसेच त्याच्या शरीरातून मलेरियाचे कोणत्याही प्रकारे संक्रमण होण्याची शक्यता मावळते.


मलेरिया प्रतिबंधक लसची प्रगती कोणत्या टप्प्यावर ?


भारताच्या मलेरिया प्रतिबंधक लसने प्री क्लीनिकल व्हॅलिडेशन हा टप्पा पूर्ण केला आहे. लवकरच ही लस वाजवी दरात बाजारात उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. भारत निवडक देशांना ही लस परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देणार आहे. लस देऊन भारत जगाभरातून मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या