भारत व युएस बोलणीला पूर्णविराम ! 'राष्ट्रहित प्रथम'

  114

प्रतिनिधी: भारतीय गुंतवणूकदार, शेअर बाजार, भागभांडवलदार, व्यापारी यांच्यासाठी चांगली व वाईट अशी संमिश्र अपडेट समोर आली आहे.अमेरिका भारत चर्चेचा तात्पुरता 'पूर्णविराम' लाग ला आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भारत राष्ट्रहितापेक्षा संवेदनशील व्यापारी कराराला मान्यता देऊ शकत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. काल पाचव्या चर्चेची फेरीचा अंतिम फेरी पार पडली. युएस भारत टेरिफ करारात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. भारताच्या शिष्टमंडळाने ट्रम्प प्रशासनाला युएसमध्ये वारंवार भेटी दिल्या आहेत. मात्र काही संवेदनशील मुद्यावरू न चर्चेचे घोडे आडले. भारतानेही टेरिफबाबत आक्रमक भूमिका घेत 'चर्चा मिडियातून होऊ शकत नाही ती बैठकीच्या पातळीवर झाली पाहिजे.'

राष्ट्रहित, घरगुती व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण ही पहिली प्राथमिकता असल्याने यावर तडजोड होणार नाही असे भारतीय शिष्टमंडळाने युएसला कळवले आहे. भारतीय बाजारात युएसला 'कुठल्या ही अटींशिवाय भारत करार करू शकतो ' अशा स्पष्ट शब्दात कळवले असल्याची माहिती पुढे आली आहे. भारत व युएस द्वीपक्षीय कराराचा (Indian US Bilateral Trade Agreements B TA) अखेर स्थगित झाले आहे. भारताचे वाणिज्य मंत्रालयाचे विशेष सचिव राजीव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ युएसशी चर्चा करत होते. मात्र ते दोन्ही बाजूने निष्फळ ठरले असले तरी राजीव अग्रवाल यांनी कणखर भूमिका घेतली आहे.

याविषयी एका कार्यक्रमादरम्यान फेरीच्या समाप्तीनंतर शनिवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या ठाम वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की भारताला राष्ट्रीय हितसंबंधांशी जुळणारा व्यापार करार अंतिम करण्यासाठी घाई किंवा जबरदस्ती केली जाणार नाही. असोचॅम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत की,'जर भारताला चांगला व्यापार करार मिळाला तर आम्ही तो पुढे करू. जर झाला नाही तर आम्ही करणार नाही. भारत नेहमीच राष्ट्रहित प्रथम ठेव तो.'

का भारताला करार स्थगित करावा लागत आहे?

जागतिक दबाव कायम असला तरीही राष्ट्रीय हिताला सरकार अधिक महत्त्व देत आहे. अमेरिकेने कराराच्या व टेरिफचा सवलती बदल्यात अशा सेक्टरमध्ये प्रवेश मागितला जिथे प्रवेश देणे अ संभव व आत्मघातकी ठरले असते. युएसने शेतकी, डिजिटल व्यापार, बौद्धिक संपदा हक्क (Intellectual property rights)आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या क्षेत्रांमध्ये विस्तृत बाजारपेठ प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना भारत युएसलग आपल्या आयटी सेवा उद्योग,कापड आणि फार्मा (औषधनिर्माण उद्योगांसाठी) अधिकाधिक प्रवेश मिळवण्यावर बोलणी करत होते‌. तर शेती आणि दुग्धशाळेसारख्या संवेदनशील क्षेत्रांना संभाव्य क्षेत्रात अमेरिकेची गुंतवणूक देशांतर्गत शेतकरी व व्यापारांच्या मूळावर आली असती‌.

वॉशिंग्टनच्या दबाव झुगारून, ज्यामध्ये प्रसारमाध्यमांतून दबाव टाकण्याच्या युएसचा वृत्तीत सार्वजनिक मुदती जाहीर करणे आणि कदाचित माध्यमांद्वारे दबाव टाकणे समाविष्ट आहे.प्रतिक्रियात्म क मार्ग टाळण्याचा आणि त्याऐवजी अधिकृत माध्यमांना चिकटून राहण्याचा भारताचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये स्वायत्तता आणि प्रतिष्ठा राखण्याच्या त्याच्या इच्छेशी सुसंगत आहे असे सर कारने म्हटले होते.

अशा सेक्टरमध्ये प्रवेश मागितला जिथे प्रवेश देणे असंभव व आत्मघातकी ठरले असते. युएसने शेतकी, डिजिटल व्यापार, बौद्धिक संपदा हक्क (Intellectual property rights)आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या क्षेत्रांमध्ये विस्तृत बाजारपेठ प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना भारत युएसलग आपल्या आयटी सेवा उद्योग,कापड आणि फार्मा (औषधनिर्माण उद्योगांसाठी) अधिका धिक प्रवेश मिळवण्यावर बोलणी करत होते‌. तर शेती आणि दुग्धशाळेसारख्या संवेदनशील क्षेत्रांना संभाव्य क्षेत्रात अमेरिकेची गुंतवणूक देशांतर्गत शेतकरी व व्यापारांच्या मूळावर आली असती‌. यामुळेच भारताने हा करार नाकारला.
Comments
Add Comment

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टीत वाढ शेअर बाजाराची गाडी पुन्हा रुळावर 'या' कारणामुळे वाढ जाणून घ्या आजचे विश्लेषण

मोहित सोमण : आज अखेरचा सत्राच्या अखेरीस इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३२९.०६ अंकाने

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या