गिरगाव चौपाटीवर आता मासेमारीला मज्जाव, नाखवा संघाची सरकारकडे धाव

बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश


मुंबई : गिरगाव चौपाटीवरील बंदर बंद करण्यात आले आहे. मच्छीमारांसह अन्य बोटींच्या मालकांनीही आपल्या बोटी या चौपाटीवरून हटवाव्यात, असे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले आहेत. मुळात गिरगाव चौपाटी व्यावसायिक बंदर नसले तरी, गेली अनेक वर्षांपासून या भागात वास्तव्य करणारे कोळी बांधव येथे मासेमारी करत होते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर संक्रांत येण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण मुंबईत अरबी समुद्र किनाऱ्यालगत गिरगाव चौपाटी आहे. जी मुंबईतील सुप्रसिद्ध चौपाटींपैकी एक आहे. मुंबईसाठी आणि मुंबईत पूर्वापार काळापासून वास्तव्य करणाऱ्या समस्त कोळी लोकांसाठी ही चौपाटी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. पूर्वी या चौपाटीवर दोन कोळीवाडे होते. त्यापैकी एका कोळीवाड्यातील रहिवाशांनी लोकमान्य टिळक यांच्या स्मारकासाठी जागा दिली. या मच्छीमारांना मासेमारीची जाळी आणि इतर साधने ठेवण्यासाठी १९३९ ते १९६८ या कालावधीत या चौपाटीवरील जागा ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.

मात्र आता गिरगाव चौपाटीवर मासेमारी करण्यास बंदी घातल्यामुळे, मासेमारी करायची तरी कुठे असा प्रश्न स्थानिक मच्छिमारांना पडला आहे. यांबद्दल नाखवा संघाचे सरचिटणीस हिरालाल वाडकर यांनी सांगितले कि, "आतापर्यंत ही जागा नाखवा संघाच्या नावावर आहे. या जागेचा संपूर्ण भरणा आम्ही केला आहे. गिरगाव चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी १९९६ मध्ये इथले बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बिर्ला क्रीडा केंद्राच्या मागील बाजूस मच्छीमारांसाठी जागा दिली. तेव्हापासून या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय सुरू आहे. आता तीही जागा तोडण्यात आली, अशी कैफियत नाखवा यांनी मांडली. चौपाटीवरील बोटी हटवण्यात याव्यात, असे मत्स्य आयुक्तालयाकडून आम्हाला सांगण्यात आले आहे."

‘न्यायालयाचे आदेश डावलून कारवाई’


मच्छीमारांना १५ दिवस आधी नोटीस देऊन मगच त्यांचे पुनर्वसन करावे, असे आदेश २००१ मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने पाळलेले नाहीत. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीने २०११ मध्ये तयार केलेल्या इतिवृत्तात गिरगाव चौपाटी बंदर रद्द झालेले नाही, असे म्हटले आहे. तसा पुरावा आमच्याकडे आहे. अटींची पूर्तता केल्याशिवाय मच्छीमारांच्या घरांवर कोणतीही कारवाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने या कारवाईत हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघाने केली आहे.

आमच्याकडे पालिकेची झोपडे पावती


२०१८ मध्ये तत्कालीन मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता, मच्छीमारांनी चार जागा सुचवाव्यात, असे सांगितले होते. २००० मध्ये पालिकेने आम्हाला झोपडे पावती दिल्याकडे संघाने लक्ष वेधले.

 
Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण