पोलिसांना दमबाजी करणाऱ्या आमदार रोहित पवारांविरुद्ध गुन्हा दाखल


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना दमबाजी करणे, पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच आवाज चढवू नको असे मोठ्या आवाजात बोलणे रोहित पवारांना भोवले आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पोलिसांशी गैरवर्तन करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासाठी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी हाणामारी प्रकरणी आव्हाडांच्या समर्थकाला अटक केली. या समर्थकाची सुटका व्हावी यासाठी आधी आव्हाडांनी निवडक कार्यकर्त्यांसोबत जाऊन रस्त्यात पोलिसांची गाडी अडवली. पण पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांना बाजूला करुन पुढील कारवाई सुरू केली. पोलीस कार्यकर्त्याला सोडत नसल्याचे बघून आव्हाड थेट पोलीस ठाण्यात धडकले. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार पण पोहोचले. पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि पोलीस अधिकारी यांच्यात वाद झाला होता. यावेळी रोहित पवारांनी पोलिसांना दमबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले. आता या प्रकरणात रोहित पवारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आव्हाडांच्या विरोधातही सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५