मुंबई : हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने देशातील ६५० स्टंटमन व स्टंटवुमनचे वैयक्तिकरीत्या जीवन विमा उतरवले आहे.
पारंजीत व अभिनेता आर्यच्या या तमिळ चित्रपटाच्या सेटवर स्टंटमॅन राजूच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मनोरंजन जगतातील सुरक्षेच्या चिंता ऐरणीवर आल्या आहेत. धडक २, जिग्रा, गुंजन सक्सेना या चित्रपटांमध्ये काम केलेले विक्रम सिंग दहिया यांनी अक्षय कुमार यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानताना, ‘अक्षय सरांचे आभार, बॉलिवूडमधील स्टंटमन व अॅक्शन क्रू सदस्य विम्याअंतर्गत येतात,’ असे त्यांनी सांगितले.