कर्जतच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आ.थोरवे आक्रमक

कर्जत : पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनलेल्या कर्जत शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जतच्या प्रशासकीय भवनात वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे आक्रमक होत त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारत नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले.


कर्जत परिसरात रस्त्यांवरील खड्डे, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालक व अपुरी पोलीस यंत्रणा यामुळे ट्रॅफिक कोंडीने गंभीर रूप धारण केले आहे. विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, शिवाजी ढवळे, गट विकास अधिकारी सुमित पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता संजीव वानखेडे, रायगड वाहतूक शाखेचे अभिजीत भुजबळ, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, परिवहन अधिकारी निलेश धोटे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी आदी उपस्थित होते.


बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, नियम मोडणाऱ्याला गय नको. रस्त्यांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनासोबत मिळून कारवाई करा अन्यथा मी स्वतः त्या ठिकाणी येऊन काम करून घेईन.' असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे आणि ट्रॅफिक समस्येवर ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.



बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि सूचना 



  • कर्जत चारफाटा येथे तात्काळ सिग्नल यंत्रणा बसवणे.

  • शनिवार व रविवार मोठ्या वाहनांची वाहतूक श्रीरामपूल मार्गाऐवजी नेरळ बायपासमार्गे वळवणे.

  • सेवालाल नगर ते गुलमोहर विश्राम गृहदरम्यान बॅरिकेड्सची व्यवस्था करणे.

  • श्रीरामपूल चौक व छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवणे.

  • नागरिकांमध्ये ट्रॅफिक जनजागृतीसाठी फलक लावणे.

  • दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ सर्कल मारणे अनिवार्य करणे.

  • नियम तोडणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी.

  • कर्जत-खोपोली मार्गावरील खड्ड्यांचे त्वरित दुरुस्ती करावी.

Comments
Add Comment

२०२३ मधील हादरवणाऱ्या संकटानंतरही अदानींनी ८०००० कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण केले! २ वर्षात 'इतक्या' कंपन्यांचे अधिग्रहण

मुंबई: अदानी समुहाला वादंगाचा आर्थिकदृष्ट्या फक्त पडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष जानेवारी २०२३

IPO Overview 2025: यावर्षी आयपीओ बाजारात 'धुमाकूळ',केवळ १ वर्षात १.९५ ट्रिलियनहून अधिक निधी प्राथमिक बाजारात उभा - मोतीलाल ओसवाल

प्रतिनिधी: लोकांमध्ये गुंतवणूकीबाबत वाढलेली जनजागृती, वाढलेली उत्पादक गुंतवणूक समज व वाढलेले उत्पन्न व

ओला इलेक्ट्रिक शेअर आज ५% उसळत इंट्राडे उच्चांकावर का वाढतोय शेअर? वाचा

मोहित सोमण: गेले अनेक दिवस घसरत असलेला ओला इलेक्ट्रिक (Ola Electric Mobility Limited) शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळला आहे. सकाळी

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

पश्चिम बंगालचा बांगलादेश बनू देऊ नका : मिथुन चक्रवर्ती यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

कोलकता : अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विरोधात तीव्र हल्ला चढवला आहे.

उबर, ओलाच्या अॅडव्हान्स टिपवर बंदी

महिला प्रवाशांसाठी महिला चालकाचा पर्याय बंधनकारक देशातील कॅब बुकिंग सेवा क्षेत्रात महत्वपूर्ण बदल नवी