निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये ३६.८६ लाख मतदार गायब

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत ९० टक्के मतदारांचा सहभाग


पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातील ९०.१२ टक्के मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये ३६.८६ लाख मतदार गहाळ, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचेही आढळले आहे.


या विशेष पुनरीक्षणाची सुरुवात २५ जून रोजी झाली होती. आयोगाने २४ जून रोजी आदेश जारी केल्यानंतर लगेचच बिहारमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील ७.८ कोटी नोंदणीकृत मतदारांना मतदार यादीत नावाची पुष्टी करण्यासाठी फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.


आयोगाच्या माहितीनुसार, ७.११ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६.८५ कोटी अर्ज डिजिटल स्वरूपात प्रक्रियेत आणण्यात आले आहेत. ६९७८ मतदार (०.०१ टक्के) ‘शोधता न येणारे’ असल्याचेही नोंदवले गेले आहे.



गहाळ, मृत, कायमस्वरूपी स्थलांतरितांबाबत आयोगाचा खुलासा


पुढील टप्पा - मसुदा यादी व हरकती  १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान मसुदा यादीवर हरकती व दावे सादर करता येतील. निवडणूक नोंदणी अधिकारी २५ सप्टेंबरपर्यंत या हरकतींचा निपटारा करतील. ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.


२५ जुलैपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन
बीएलओ यांनी सांगितले की, ते २५ जुलैच्या काही दिवस आधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हरकती अथवा दावे २५ जुलैपूर्वी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.


राजकीय पक्षांना यादी मोफत  प्रिंट व डिजिटल स्वरूपात अंतिम मतदार यादी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत दिली जाणार असून, ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले