खोटी माहिती प्रसारित केल्यासंदर्भात ट्रम्प यांनी रुपर्ट मर्डोक आणि वॉल स्ट्रीट जर्नलवर दाखल केला खटला, १० अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई मागितली

  65

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी वॉल स्ट्रीट जर्नल आणि रुपर्ट मर्डोकसह त्याच्या मालकांवर खटला दाखल केला आणि १० अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई मागितली. ट्रम्प यांनी २००३ मध्ये जेफ्री एपस्टाईन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवल्याचे वृत्त या वृत्तपत्रामध्ये प्रसारित करण्यात आले आले होते, ज्यामध्ये एका नग्न महिलेचे रेखाचित्र आणि ट्रम्प यांची अश्लील स्वरूपात स्वाक्षरी होती.


मियामीमधील फ्लोरिडाच्या दक्षिणी जिल्ह्यातील फेडरल कोर्टात दाखल केलेला हा खटला वॉल स्ट्रीट जर्नलने २००३ मध्ये ट्रम्प यांनी एपस्टाईन (Epstein Files) यांना वाढदिवसाचे पत्र पाठवल्याचा दावा प्रकाशित केल्यानंतर काही दिवसांनी आला आहे.



वाढदिवसाच्या पत्रात काय होते?


अहवालानुसार, घिसलेन मॅक्सवेल यांनी कथितरित्या संकलित केलेल्या वाढदिवसाच्या अल्बममध्ये एका नग्न महिलेचे रेखाचित्र होते ज्यावर ट्रम्प यांची सही अश्लील स्वरूपात होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी या बातमीचे जोरदार खंडन केले असून, हे पत्र देखील बनावट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "द वॉल स्ट्रीट जर्नलने एपस्टाईनला लिहिलेले बनावट पत्र प्रकाशित केले आहे. हे माझे शब्द नाहीत, मी असे बोलत नाही आणि मी रेखाचित्र देखील काढत नाही."


दुसऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले: "मी रूपर्ट मर्डोकला सांगितले की हा एक घोटाळा आहे, त्यांनी ही बनावट कथा प्रकाशित करू नये, परंतु त्यांनी ती प्रकाशित केली. आता मी त्यांच्यावर आणि त्यांच्या घृणास्पद वृत्तपत्रावर खटला भरणार आहे."


ट्रम्प यांनी असेही म्हटले की मर्डोक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. "मर्डोक म्हणाले की ते या प्रकरणाची चौकशी करतील, परंतु असे करण्याचा अधिकार त्यांना नाही असे दिसते. त्याऐवजी, ते खोटी, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक कथा प्रकाशित करत आहेत,"



ट्रम्प आणि एपस्टाईन प्रकरण काय आहे?


जेफ्री एपस्टाईन, एक श्रीमंत अमेरिकन फायनान्सर वर २००६ मध्ये लैंगिक गुन्ह्यांचा आरोप लावण्यात आला होता, त्याने फ्लोरिडा येथील एका १४ वर्षांच्या मुलीच्या घरी तिच्यावर विनयभंग केला होता. संबंधित मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर त्याच्यावर पोलीस कारवाई झाली. त्यानंतर त्याला सुमारे १३ महिने तुरुंगवास भोगावा लागला.
त्यानंतर, जुलै २०१९ मध्ये, त्याला पुन्हा न्यू यॉर्कमध्ये अटक करण्यात आली आणि पैशाच्या बदल्यात तब्बल १२ मुलींची तस्करी आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला. मात्र या दरम्यान एपस्टाईनने त्याच्यावरील हे आरोप फेटाळले. १० ऑगस्ट २०१९ रोजी, तो तुरुंगात असताना, त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात काहींना असे वाटते की अधिकारी एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांना, ज्यात ट्रम्प यांचाही समावेश आहे, त्यांना वाचवण्यासाठी त्याबद्दलची माहिती लपवत आहेत.


तथाकथित एपस्टाईन फाइल्सच्या सुटकेसाठीच्या आवाहनांना दडपण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहेत. गेल्या आठवड्यात न्याय विभाग आणि एफबीआयने दिलेल्या मेमोमध्ये म्हटले होते की एपस्टाईन फाइल्समध्ये पुढील तपासाला समर्थन देणारे पुरावे नाहीत. मेमोमुळे दोन्ही एजन्सींच्या प्रमुखांना राजीनामा देण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments
Add Comment

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून

मोठी बातमी! इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू

येमेनमधील सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधानासह अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू  सना:

Trump is Dead सोशल मीडियावर होतंय प्रचंड ट्रेंड!

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने जगातील अनेक देशातील आर्थिक

पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतर चीन दौऱ्यावर, जिनपिंग आणि पुतिनना भेटणार

तियानजिन : जपानच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते विशेष विमानाने

५०० हून अधिक ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रांचा मारा... रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला,

कीव: रशियाने युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला उधळून लावत त्याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनवर ड्रोन हल्ले

Trump Tarrif: ट्रम्प यांना घरचा आहेर! अमेरिकन न्यायालयानेच टॅरिफला केले बेकायदेशीर घोषित

ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव वॉशिंग्टन डीसी:  ट्रम्प टॅरिफमुळे