लाडक्या बहिणींचे आरोग्य चांगले रहावे'; ५ कोटींचा निधी देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाणे : नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात केली. ठाणे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपीटल फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील पालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त संदिप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रोटरी क्लबचे डॉ. कारखानीस यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या अभियानात महिलांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह आणि हिमोग्बोलीनची तपासणी, स्त्रीयांचे निरोगी राहणीमान आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबीर यांचा अंतर्भाव आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी याप्रसंगी केले.

माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.

तीन कोटी महिलांची तपासणी

लाडक्या बहिणींचा आरोग्य चांगले राहावे, हे आमच्या सगळ्यांची भावना आहे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना लाडक्या बहिणी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वत:साठी वेळ काढत नाही. यामुळेच मुख्यमंत्री असताना माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. यात जवळपास तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती आणि त्याचा फायदाही झाला. निदान झाल्यानंतर महिलांना पुढचे उपचार करण्यात आल्याने अनेक महिलांचा आजार बरा झाला.
Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण