बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

१२३ बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, ७८ बाईक टॅक्सी जप्त 


मुंबई: मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा परिवहन विभागाकडे तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत . त्या अनुषंगाने तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतेच, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे सध्या या संबंधित कारवाईला जोरदार सुरवात करण्यात आली आहे.


बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे धडक मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान अवैधरित्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक टॅक्सी) अटकावून ठेवण्यात आली आहेत व अवैध ॲग्रीगेटरविरुध्द फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे.


मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीनुसार मोटार व्हेईकल ॲग्रीग्रेटर पॉलिसीनुसार ॲप बेस प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असताना सध्या या कंपन्यांकडून अशा कुठल्याही तरतुदींचे पालन न करता विना परवानगी प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे आढळले.

Comments
Add Comment

E-Water Taxi : काय सांगता? गेटवे ते जेएनपीए फक्त ४० मिनिटांत! ई-वॉटर टॅक्सीची धमाकेदार एंट्री; 'या' तारखेपासून होणार सुरु

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी आता

कुपर रुग्णालयाविरुद्धच्या सततच्या तक्रारीमुळे BMC चा मोठा निर्णय, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा

मुंबई: विलेपार्ले येथील डॉ. आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सतत येणाऱ्या

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि