Indel Money: NBFC 'इंडेल मनी' कंपनीच्या पश्चिम भारतातील पदचिन्हांत विस्तार मुंबईत प्रथम नव्या शाखेचे उद्घाटन

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये ४५ शाखा सुरू करण्याची योजना


मुंबईमध्ये नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन


मुंबई: भारतातील वेगाने वाढणाऱ्या सोने तारण कर्ज क्षेत्रातील बँकेतर वित्तीय कंपनी (NBFC) असलेल्या इंडेल मनीने पश्चिम भारतात आपला ठसा विस्तारण्याच्या उद्देशाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान मध्ये धोरणात्मक विस्तारा ची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कंपनीने या प्रदेशात वाढ आणि धोरणात्मक कामकाज सुलभ करण्यासाठी मुंबईत नोंदणीकृत कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन केले आहे.आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरपर्यंत या तीन राज्यांमध्ये शाखांचे जाळे ४५ पर्यंत वाढवण्याचे इंडेल मनीचे उद्दिष्ट आहे. सध्या इंडेल मनीच्या या प्रदेशात ३७ शाखा कार्यरत आहेत. ज्यापैकी महाराष्ट्रात २२, गुजरातमध्ये १० आणि राजस्थानमध्ये ५ असून मुंबई, पुणे, नागपूर,अहमदाबाद,सुरत, राजकोट, जयपूर, जोधपूर आणि उदयपूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये तिची मजबूत उपस्थिती आहे.


या विस्ताराबाबत बोलताना, इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश मोहनन म्हणाले,'आमच्या दीर्घकालीन विकास धोरणात भारताचे पश्चिम क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावतो. घरगुती सोन्याच्या मालकीचे प्रमाण येथे जास्त असून ही सोन्याच्या आधारे कर्ज घेण्याचा व्याप तुलनेने कमी आहे. या प्रदेशातून ग्राहकांच्या मागणीत ३५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले आहे. आमचा विस्तार पारदर्शक, सुरक्षित असेल आणि तंत्रज्ञान-सक्षम कर्ज प्रारूपाद्वारे या वाढत्या गरजेला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.'ते पुढे म्हणाले, 'आम्ही जसजसे विस्तार करत आहोत तसतसे आमचे लक्ष जबाबदार वाढीवर आहे. अनुपालन,ग्राहकांचा विश्वास आणि कार्यात्मक उत्कृष्टतेवर आधारित ही वाढ आहे. पश्चिमेकडील बाजारपेठ ही एक महत्त्वाची भर आहे आणि अर्थपूर्ण आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान, स्थानिक भागीदारी आणि बाजार-विशिष्ट नवकल्पनांमध्ये गुंतवणूक करत राहू.' पश्चिमेकडील विस्तार हा इंडेल मनीच्या संपूर्ण भारतातील वित्तीय सेवा प्रदात्यामध्ये विकसित होण्याच्या व्याप क धोरणाशी सुसंगत आहे ज्यामध्ये पश्चिमेकडील प्रदेश त्याच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय योगदान देईल अशी अपेक्षा आहे.


ही घोषणा वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी मुख्य प्रवाहातील, अल्पकालीन पतपुरवठ्याचा उपाय म्हणून सोने तारण कर्जांच्या वाढत्या मागणी दरम्यान आली आहे. कंपनीने याविषयी बोलताना म्हटले आहे की,' इंडेल मनीची पारदर्शक, नियमन केलेली आणि विनासायास सोन्याच्या आधारावर कर्ज देण्याची वचनबद्धता पश्चिम भारतातील कमी व्याप्ती असलेल्या शहरी आणि निमशहरी बाजारपेठांना सेवा देण्यासाठी चांगली आहे.आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक १० टक्के वाढ नोंदव ली जी एकूण कर्ज वितरणांत वाढीमुळे झाली. ३१ मार्चपर्यंत तिच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (Asset Under Management AUM) वार्षिक ५२% वाढून २४०० कोटी झाली आहे तर कर्ज वितरण अंदाजे ६००० कोटी झाले आहे. सकल अनुत्पादक मालमत्ता (Gross NPA) प्रमाण मागील वर्षीच्या ३.२ टक्क्यांवरून १.४% लक्षणीयरीत्या सुधारले आहे. पुढे जाऊन पाहता, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १०,००० कोटी कर्ज वितरित करण्याची आणि वर्षाचा शेवट ४,००० कोटीच्या मालमत्तेची पातळी गाठून करण्याची इंडेल मनीला अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

घोणसरी येथे मादी बिबट्याला पकडून सोडले अधिवासात

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले.

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी