"मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही": उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठाला इशारा

  53

‘म’ मराठीचा नव्हे तर मलिदा आणि मतलबाचा: उपमुख्यमंत्री शिंदे यांची खरमरीत टीका


मुंबई: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भरलेल्या ताटाचे विचारता पण जनतेच्या मतांची माती कोणी केली? देवेंद्रजींच्या पाठित खंजीर कोणी खुपसला? असे प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उबाठाला केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. पालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल जो काही अपप्रचार होतो तो सगळ्यांना अवगत झालाय. वरुन किर्तन आणि आतून तमाशा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मराठीचं प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही. जन्मलो मराठी, मराठीसाठीच जगणार आणि मराठीसाठीच खपणार, असे ते म्हणाले.

तुमच्या तोंडी ‘म’ म्हणजे महापालिकेचा, ‘म’ मलिद्याचा


मराठी माणूस तुमच्या फेक नरेटिव्हला आता फसणार नाही. कारण तुमच्या तोंडी ‘म’ म्हणजे महापालिकेचा, ‘म’ मलिद्याचा, ‘म’ मतलबाचा आणि ‘म’ मतांचा आहे आणि तुमच्या मनात फक्त मतांचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा मी बोलतो. आरोपांना आरोपाने नाही तर कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फेसबुकवाले सामोरे जाऊ शकत नाही म्हणून सकाळ दुपार व संध्याकाळ माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका करण्यापूर्वी तुमच्याकडे तीन बोटं आहेत त्याचा विचार करा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले.

भरलेल्या ताटाचे विचारता...


ते पुढे म्हणाले की, इतक्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही. ज्यांना कस्पटासमान समजले, संपलेले लोक असल्याचे हिणवले मात्र त्यांच्याच मागे रोज जावे लागतंय, चल मेरे भाई तेरे हाथ जोडतां हू, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. भरलेल्या ताटाचे विचारता पण निकालानंतर जनतेच्या मतांची माती कोणी केली, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर देवेंद्रजींनी ५० फोन केले ते का नाही उचलले. देवेंद्रजींच्या पाठित खंजीर कोणी खुपसला, असे प्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केले. गुवाहाटीला असताना तुम्ही दिल्लीशी संधान बांधण्याचा प्रयत्न करत होतात. आम्ही सत्ता सोडून गेलो. गद्दारी तुम्ही केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

फडणवीसांमुळे शिवसेनेला मुंबईचे महापौर पद


मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं महापौरपद केवळ आपल्या विनंतीमुळे शिवसेनेला बहाल केलं गेलं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केला. या घटनेला आमदार मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत, असे ते म्हणाले. भाजपने महापौरपदाची तयार केली होती, मात्र आपण देवेंद्रजींना विनंती केली की महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या, त्यांनी अर्धा तासांत विचार करुन पत्रकार परिषद घेत महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं. मात्र २०१९ मध्ये दगा, धोका आणि विश्वासघात करुन त्याची परतफेड केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक तू राहशील नाहीतर मी, अशी टोकाची भाषा त्यांनी केली. त्यामुळेच त्यांचा कार्यक्रम करावा लागला, असे ते म्हणाले.
Comments
Add Comment

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र

जरांगे आरक्षण मिळेपर्यंत पाणी पण बंद करणार

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे