चाकरमान्यांना बाप्पा पावला

भाविकांसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या 


पालघर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वेने दोन विशेष गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा राहणार आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा
मिळणार आहे.


कोकणातील गणेश भक्तांच्या सोयीसाठी दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. विश्वामित्री-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११०/०९१०९) ही गाडी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई येथे थांबणार आहे. ही गाडी ऑगस्ट महिन्यात २३, २७ आणि ३० ऑगस्ट रोजी, तसेच सप्टेंबर महिन्यात ३ आणि ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरीकडे जाईल. पालघरमध्ये दुपारी २.२० वाजता ही गाडी थांबेल आणि रात्री रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २४ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी धावेल. रत्नागिरीहून रात्री सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.


तसेच वडोदरा-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११४/०९११३) ही दुसरी विशेष गाडी २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जाण्यासाठी निघेल. ही गाडी पालघरमध्ये दुपारी ३.३० वाजता थांबेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरीहून सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती

पाच लाखांहून अधिक नागरिकांची सिकलसेल तपासणी पालघर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्ह्यात

हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता रद्द !

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष भोवले गणेश पाटील पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना

महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला

विरार : महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासन निवडणूक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी

घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीसाठी बदल पालघर : ठाणे - घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन न

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर