भिलाई : छत्तीसगडमधील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना शुक्रवारी ईडीने अटक केली आहे. ईडीने बघेल कुटुंबाच्या भिलाई (जिल्हा दुर्ग) येथील निवासस्थानी छापेमारी केली होती. हा तपास मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत सुरू आहे आणि ईडीच्या हाती नवीन पुरावे लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.