गरीब हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा : मंत्री नितेश राणे
'खरा शकुनी, खरा व्हिलन उद्धव ठाकरेच' : मंत्री नितेश राणे
मुंबई : “कटेंगे तो बटेंगे” या फॉर्म्युल्यावरच ठाकरे बंधू चालतायत, असा जबरदस्त घणाघात थेट मंत्री नितेश राणेंकडून करण्यात आलाय. राजकारणाच्या रणांगणात ठाकरे बंधूंचा एकमेकांवरचा विश्वासच राहिलेला नाही, अशी खरमरीत टीका करत राणेंनी ‘घरातलंच घरभेदी’ चित्र समोर ठेवलंय.
पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की, तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असं आव्हान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं. यावर शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे मराठी शिकवली जात नाही, तिथे अभ्यास शिकवला जात नाही, असं भाजपचे नेते व मंत्री नितेश राणेंनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मीरारोडच्या सभेत ठणकावून सांगितलं होतं. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही तुमच्याशी भांडण नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांद्वारे मसूद अझहरला भारताकडे सोपवण्याची मागणी, पण... जम्मू काश्मीर: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ...
हिंदूंवर हात उचलत असाल तर... नितेश राणे
तुम्ही कानाखाली मारायचा बोलता, तर नयानगरला जाऊन मारा...तिथल्या लोकांच्या कानाखाली आवाज काढून दाखवा. हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं. ठाकरे बंधू कटेंगे तो बटेंगेचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत का?, अशी टीकाही नितेश राणेंनी केली. इस्लाम राष्ट्र होऊ नये, यासाठी हिंदूने एकत्र यायला पाहिजे...हिंदूना एकत्र यायला हवं, एक है तो सेफ है, असंही नितेश राणे म्हणाले. हिंदू लोकांसोबत सरकार आहे. हिंदूंवर जर कोणी हात उचलत असेल, तर त्याला सोडला जाणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.
नया नगरमध्ये सभा घ्यायला हवी होती - नितेश राणे
नितेश राणे यांनी यावेळी पत्रकारांसमोर मोबाइलमधील व्हिडिओ क्लिपही दाखवली. “यांच्या थोबाडातून मराठी कधी निघणार? यांना सूट दिलीय का, आम्हाला धमक्या देण्याची. या लोकांना इस्लामी राष्ट्र बनवायचं आहे. हिंदू समाज संपवायचा आहे. त्यांना कोणी बोलत नाही. नया नगरमध्ये कोणाला मराठी बोलायला लावत नाही. उगाच गरीब हिंदुंना मारायचं” असं नितेश राणे म्हणाले.
संजय राजाराम राऊतच वय झालय
संजय राऊत म्हणतात निशिकांत दुबेबद्दल भाजपमध्ये कोणी बोललं नाही. त्यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं. “संजय राजाराम राऊतच वय झालय. त्याला कळत नाही. आशिष शेलारांनी विधान परिषदेत भाषण केलय. पाहिजे तर त्याला टेपरेकॉटर पाठवतो. त्याच्या ज्ञानात भर पडेल. भाजपने पहिला विरोध केला. निशिकांत दुबे जे बोलले ते आम्हाला मान्य नाही. हिंदू म्हणून आम्ही आपसात का भांडावं? नया नगर, भेंडीबाजारमध्ये शीर कुर्मा, बिर्याणीची पार्टी व्हावी म्हणून?” असं नितेश राणे बोलले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू. सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे. असं राज ठाकरे म्हणाले.