मुंबई : मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमधून १,४५२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे . मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी बँकॉकहून ड्रग्ज तस्करीसाठी येणाऱ्या ह्या प्रवाशाला अटक केली आहे . आणि त्याच्याकडे असलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे .
ड्रग्ज तस्करी करणाऱ्या या आरोपीचे नाव साबिथ मम्मुहाजी आहे, त्याला त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेल्या सहा गांजाच्या पॅकेटसह पकडण्यात आले. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १.४५ कोटी रुपये आहे.
मुंबई कस्टम्सला मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली. जप्तीनंतर, मम्मुहाजीवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.