JSW Steel Q1FY26 Results: JSW Steel तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या PAT नफ्यात १५८% वाढ !

प्रतिनिधी: सज्जन जिंदाल संचलित जेएसडब्लू स्टीलने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर नफ्यात १५८% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला मागील वर्षाच्या तिमाहीत ८४५ को टींचा करोत्तर नफा (Profit after tax PAT) झाला होता तो यावर्षी पहिल्या तिमाहीत वाढत २१८४ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) यामध्ये मागील वर्षी तिमाहीतील ४२९४३ वरून वाढत ४३१४७ कोटी रुपये मिळाला आहे. कंपनीला एकूण या तिमाहीत निव्वळ नफा २२०९ कोटींवर पोहोचला असून निव्वळ नफ्यात तब्बल १५५% वाढ झाली आहे.

माहितीनुसार, कंपनीच्या मागील वर्षाच्या तिमाहीतील ४५०४९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३.४५% उत्पन्न घसरत ४३४९७ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीच्या खर्चात मागील वर्षाच्या तिमाहीतील ४३०३२ कोटींवरून या तिमाहीत ६.२९% घसरण झाली असून खर्च ४०३२५ कोटींवर पोहोचला आहे. स्टीलची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६.१२ मेट्रिक टन वरून ६.६९ मेट्रिक टन झाली. भारतातील त्यांच्या कामकाजातील विक्री गेल्या वर्षीच्या ५.९० मेट्रिक टन वरून ६.४३ मेट्रिक टन झाली.कंपनीच्या ऑपरेटिंग करपूर्व कमाई (Operating EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३७% वाढ झाली आहे.

माहितीनुसार, तिमाहीच्या अखेरीस कंपनीचे निव्वळ कर्ज (Debt to equity ratio) ०.९५ पट होते जे आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीच्या अखेरीस ०.९४ पट होते आणि EBITDA वर निव्वळ कर्ज ३.२० पट होते जे आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीत ३.३४ पट होते. ३० जून २०२५ पर्यंत निव्वळ कर्ज  ७९८५० कोटी होते  जे ३१ मार्च २०२५ च्या ३२८७ कोटींपेक्षा जास्त होते. JSW स्टीलनुसार, ही वाढ मुख्यतः खेळत्या भांडवल गुंतवणुकीमुळे झाली. कंपनीने बाजार बंद होण्यापूर्वी निकाल जाहीर केल्यानंतर एनएसईत कंपनीच्या शेअर्समध्ये १%, बीएसईत ०.१०% वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक