Gold Silver Rate Marathi News: सोन्याच्या दरात सलग दुसऱ्यांदा वाढ सोन्याचांदीत सापशिडीचा खेळ सुरू चांदीही घसरली 'हे' आहे विश्लेषण

मोहित सोमण:आज जागतिक सराफा बाजारातील सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. यापूर्वी चढउताराचे सत्र चालूच होते आज महागण्याची पुनरावृत्ती सोन्याने सुरु ठेवल्याने सोन्याच्या निर्देशांकात आज वाढ झाल्याने भारतीय बाजारातही सोने वधारले आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या दरात ५ रूपयांनी वाढ झाली, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपये, तर १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४ रूपये वाढ झाली. परिणामी आज २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९९३८, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९११०, १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ७४५४ रूपयांवर गेले आहेत.माहितीनुसार, सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५० रूपये वाढ झाल्याने दरपातळी ९९३८० रूपयांवर गेली आहे. २२ कॅरेट सोन्या च्या प्रति तोळा किंमतीत ५० रूपये वाढ झाल्याने दरपातळी ९११०० रूपयांवर तर १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४० रूपये वाढ झाल्याने दरपातळी ७४५४० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक(Gold Futures Inde x) यामध्ये ०.६३% वाढ झाल्याने संध्याकाळपर्यंत सोन्याचे दर प्रति डॉलर ३३६६.१७ रूपये प्रति औंसवर गेले आहेत. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.५९% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) बाजा रातील सोन्याच्या निर्देशांकात ०.५४% वाढ झाल्याने दर पातळी ९७९९९.०० रुपयांवर पोहोचले आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार,भारतीय सराफा बाजारात मुंबई, पुण्यासह महत्वाच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर ९९३८ रूपये, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९११० रूपये, १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ७४५४ रूपये आहे.


युएस बाजारातील जूनमधील किरकोळ विक्री (Retail Sales) ०.१% मासिक विक्रीच्या अंदाजापेक्षा जास्त झाली होती जी आकडेवारी जाहीर झाली. ०.६% दराने विक्री वाढली आणि मे महिन्यातील ०.९% घसरणीला मागे टाकले. प्रामुख्याने ही वाढ टेरिफ वाढीने झाली आहे ज्यामुळे सोन्याला वाढलेली मागणी भाव वाढण्यास कारणीभूत ठरली. दुसरीकडे सातत्याने डॉलर वाढत असल्याने गोल्ड फ्युचरला बेस तयार झाला होता. युएस फेडच्या गव्हर्नर एड्रियाना कुगलर यांनी त्यांच्या आपल्या वक्तव्यात असेही म्हटले होते की महागाई लक्ष्यापेक्षा (Target) जास्त आहे, तर कामगार बाजार स्थिर आणि लवचिक (Flexible) आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की सीपीआय चलनवाढ मुख्य वस्तूंपर्यंत विस्तारत आहे या वक्तव्यावर सोन्याने आज जोर पकडला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या च्या पुरवण्यापेक्षा मागणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. परिणामी रूपया घसरल्याने निर्देशांकात आणखी वाढ होत आहे.


आजच्या सोन्याच्या कामगिरीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' डॉलर निर्देशांकात थोडीशी कमजोरी दिसून आली आणि युरोपियन युनियनने रशियावर विशेषतः तेल व्यापाराला लक्ष्य करून नवीन नि र्बंध पॅकेज मंजूर केल्याने नवीन भू-राजकीय चिंता पुन्हा निर्माण झाल्या. यामुळे सुरक्षित-निवासी मालमत्तेतील भावना उंचावल्या ज्यामुळे कॉमेक्स सोन्याला $3350 चा टप्पा पुन्हा मिळवण्यास मदत झाली. सोन्यातील अलीकडील चढउतार $3280-$3370 दर म्यान श्रेणीबद्ध आणि अस्थिर आहे.आता लक्ष फेड चेअर पॉवेल यांच्या पुढील आठवड्यातील भाषणाकडे वळले आहे, जे व्याजदराच्या दिशेने नवीन संकेत देऊ शकते आणि सोन्याच्या मार्गावर परिणाम करू शकते.'


चांदीतही किरकोळ घसरण कायम !


सोन्याच्या दराप्रमाणे आज चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. सोन्यात सातत्याने वाढ होत असल्याने पर्याय म्हणून तसेच ईव्ही व औद्योगिक क्षेत्रातील मागणीमुळे चांदी महागत होती. असे असताना फेड व्याजदरात कपात होईल का याची अनिश्चितता कायम असल्याने चांदीचे दर आठवड्याचा सुरूवातीला गगनाला भिडले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याचा पाठपुरावा करताना,१ ऑगस्टपासून औषधनिर्माण आणि सेमीकंडक्टरसारख्या अमेरिकन आयातीवरील नवीन कर जोखीम लक्षात घेता महागाईचा दबाव झेलण्यासाठी व्याजदर वाढू शकतात. अशा परै स्थानिक पातळीवर, मजबूत गुंतवणूक भावनांमुळे चांदीला चांगला पाठिंबा आहे. भारतीय चांदीच्या ईटीएफमध्ये जून तिमाहीत ३९.२५ अब्ज डॉलर्सचा परदेशी गुंतवणूक प्रवाह (Inflow)दिसून आला याच कालावधीत सोन्याच्या ईटीएफमध्ये २३.६७ अब्ज डॉलर्सचा गुंतवणूकदारांचा सहभाग होता.


मात्र संध्याकाळपर्यंत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होऊ शकते असे संकेत युएस बाजारात मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चांदीचे दर घसरले आहेत. भारतीय बाजारात माहितीनुसार प्रति ग्रॅम चांदी ०.१० रूपये घसरली आहे तर चांदीचा प्रति किलो दर १०० रुप यांनी घसरला आहे. चांदीच्या आंतरराष्ट्रीय सिल्वर फ्युचर निर्देशांक (Silver Futures Index) यामध्ये संध्याकाळपर्यंत ०.८५% वाढ झाली आहे. तर भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्समध्ये चांदीच्या १.०२% इतकी भरभक्कम वाढ झाली आहे. माहितीनुसार, भारतातील मुंबई पुण्यासह महत्वाच्या शहरात सरासरी चांदीचे दर प्रति ग्रॅम ०.१० रूपयाने घसरल्याने ११३.९० रूपये व प्रति किलो दर १०० रूपये घसरल्याने ११४००० रूपयांवर आहेत.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत