Ex Dividend Today: लाभांश कमाईसाठी 'या' कंपन्यांच्या शेअर्स आजच खरेदी करा.. Dividend कमावण्यासाठी आज अखेरची संधी!

प्रतिनिधी: जाहीर होत असलेल्या तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी लाभांश (Dividend) जाहीर केला अथवा सूचवला आहे. या कंपन्यांचे शेअर्स नसलेल्यांनी आज शेअर्स घेतले तर आजपर्यंत विकत घेतलेल्या भागभांडवलधारकांना हा लाभांश मिळणार आहे असे कंपनीने सांगितले.उद्या याशेअर्सची खरेदी केल्यास मात्र लाभांश संबंधित गुंतवणूकदारांना मिळणार नाही. लाभार्थ्यांना लाभांश T +1 Settlement पद्धतीने नोंदणी तारखेच्या (Record Date) पेक्षा एक दिवसआधी विकत घेतलेल्या भाडभांडवलधारकांना लाभांश मिळेल.


कोणकोणत्या कंपन्यांचा आज अखेरचा Ex Dividend जाहीर ?


१) कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)- बँकेने आपला लाभांश ३१ मार्च २०२५ पर्यंत २.५० रूपये प्रति इक्विटी शेअर लाभांश घोषित केला. ५ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअर्सवर हा लागू असेल.आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) मध्ये याविषयी अंतिम निर्णय बँकेचे संचालक मंडळ (Board of Directors) घेऊ शकतात असे कंपनीने म्हटले आहे.


२) डाबर इंडिया (Dabur India)- डाबर इंडियाने मागील आठवड्यात आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, कंपनी आपल्या भागभांडवधारकांना ५.२५ रूपये लाभांश प्रति शेअर देऊ शकते.


३) अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Afcon Infrastructure Limited) - कंपनीने प्रति शेअर २.५ रूपयांचा अंतिम लाभांश जाहीर केलेला आहे. मागील महिन्यात कंपनीने तिमाही निकाल जाहीर केला होता.


४) भारती एअरटेल (Bharti Airtel Limited)- एअरटेल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी १६ रूपये प्रति शेअर लाभांश पेडअप इक्विटी समभागांसाठी (Paid up equity Shares) साठी घोषित केला आहे. ज्यांचे पार्टली पेड शेअर आहेत त्यांच्यासा ठी ४ रूपये लाभांश प्रति समभाग सुचवला आहे. संचालक मंडळाने झालेल्या बैठकीत लाभांश सूचवला होता.


५) बजाज इलेक्ट्रिक्लस- (Bajal Electricals Limited)- बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचा अंतिम लाभांश ३ रूपये प्रति समभाग जाहीर झाला आहे.


६) बिर्लासॉफ्ट लिमिटेड (Birla Soft Limited)- बिर्लासॉफ्ट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी ४ रूपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.


७) एक्साईट इंडस्ट्रीज लिमिटेड - (Exide Industries Limited) - कंपनीने २ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला.


८) इंटलेक्ट डिझाईन एरिना लिमिटेड (Intellect Design Arena Limited) - कंपनीने ४ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला आहे. तसेच ३ रूपये प्रति समभाग विशेष लाभांश (Special Dividend) जाहीर केला त्यामुळे गुंतवणूकदारांना एकूण ७ रूपयांचा लाभांश मिळू शकतो.


९) कमिन्स इंडिया लिमिटेड (Cummins India Limited) - कंपनीने एकूण ३३.५० रूपयांचा लाभांश प्रति शेअरवर जाहीर केला आहे.


१०) ब्लू स्टार (Blue Star) - कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी ९ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला आहे.


११) धनुका अँग्रीटेक लिमिटेड (Dhanuka Agritech Limited) - कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी २ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,