Axis Bank Share : ॲक्सिस बँकेचा शेअर तिमाही निकालानंतर ६% आपटला !

प्रतिनिधी:ॲक्सिस बँकेच्या तिमाही निकाल (Q1FY26) घसरल्याने बँकेच्या समभागांनी (Stocks) सकाळच्या सत्रात कच खाल्ली. अपेक्षेपेक्षा कमी निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला. त्यातून विक्रच्या दबावामुळे बँकेचा शेअर १२ वाजे पर्यंत ४.१६% घसरला आहे. सत्राचा एकदम सुरूवातीला बँकेचा शेअर ६% कोसळला होता. ॲक्सिस बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३% घसरण निव्वळ नफ्यात नोंदविली आहे. मागील वर्षाच्या मार्च तिमाहीतील ६०३४ कोटींच्या तुलनेत नफा घसरण या पहिल्या तिमाहीत ५८०६ कोटीवर गेल्याने शेअर्सने घसरण नोंदवली आहे.


जेएम फायनांशियलने नोंदवलेल्या माहितीनुसार, बँकेने करोत्तर नफ्यात (PAT) ४% घसरण नोंदवली. तज्ञांचा मते बँकेच्या असेट क्वालिटीत घसरण झाल्याने ही कामगिरी बँकेने नोंदवली गेली. मात्र जेएम फायनांशियलने नोंदवलेल्या माहितीनुसार, बँकेने आपल्या नफ्यातील वाढीव तरतूदीमुळे करोत्तर नफ्यात घसरण झाली. तरी भविष्यातील चांगल्या कामगिरीचा पार्श्वभूमीवर ब्रोकिंग कंपनीने १३३० रुपयांवर 'Buy Call' दिला होता. बँकेच्या माहितीनुसार,आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस बँकेच्या संचयी तर तुदी (NPA वगळून) ११,७६० कोटी रुपये होत्या ज्याने ३० जून २०२५ पर्यंत १.१२% मानक मालमत्ता (Standard Assets)कव्हरेज दर्शविले होते. मानक आणि अतिरिक्त तरतुदींसह तरतूद कव्हरेज (PCR) एकूण एनपीएच्या १३८% होता.तिमाहीसाठी क्रेडिट कॉ स्ट (वार्षिकीकृत) १.३८% नोंदवण्यात आला.


बँकेच्या स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील १.२८% तुलनेत वाढ होत यंदा तिमाहीत १.५७% वाढ झाली. बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) यांमध्ये १०१०६ कोटीवरून १४% वाढ होत नफा ११५१५ कोटींवर पोहोचला होता. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) मागील तिमाहीप्रमाणे समान राहत १३५६० कोटी रूपयांवर कायम राहिले आहे. दरम्यान जेएम फायनांशियल व्यतिरिक्त इतर ब्रोकिंग रिसर्च कंपन्यांनी कंपनीच्या शेअर्सवर संमिश्र प्रतिक्रिया दिली. मोतीलाल ओसवालने, कंपनीच्या शेअरवर ' तटस्थ ' (Neutral)कौल दिला. नुवामाने मात्र शेअरला 'खरेदी' (Buy Call) करण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या शिफारशीपेक्षा 'होल्ड' (Hold) करण्यासाठी डाउनग्रेड केले आहे आणि लक्ष्य किंमत (Target Price TP) देखील पूर्वीच्या १,४०० वरून १,१८० रूपयापर्यंत ब्रोकिंग कंपनीने कमी केली आहे.'

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७