भाडे वाढवून मिळण्यासाठी उबर, ओला चालकांचा संप, प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. ॲप कंपन्यांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिकिमी भाडे वाढवून मिळावे, अशी या चालकांची मागणी आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणे आमचे दरही निश्चित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यासाठी मंगळवार (दि.१५) पासून आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालकांचे आंदोलन सुरु आहे.या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे.


ओला, उबर, रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या शेकडो चालकांनी मंगळवार(दि.१५) पासून संप सुरू केला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.


या आंदोलनातील एक मुख्य मुद्दा म्हणजे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅप-आधारित परिवहन कंपन्यांचे नियमन करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ही मागणी आहे. परिवहन विभागाच्या अलीकडील एका पत्रानुसार, या कंपन्या निलंबनाच्या आदेशांनंतरही बेकायदेशीररीत्या दुचाकी टॅक्सी आणि बस चालवित आहेत. परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रॅपिडोची दुचाकी टॅक्सी सेवा थांबवण्यात आली आहे, मात्र अ‍ॅपवरील हालचाली आणि स्क्रीनशॉट दर्शवतात की ही सेवा अजूनही सुरू आहे.


आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार नियमभंग करूनही या अ‍ॅप प्लॅटफॉर्म्सना कोणतीही शिक्षा होत नाही, मग ती सर्ज प्रायसिंग (दरवाढ), कामगारांचे शो


षण किंवा भारतीय परिवहन नियमांचे उल्लंघन असो. आंदोलनकर्त्यांनी यावेळी केंद्रीय परिवहन मंत्रालयावरही टीका केली आहे की, त्यांनी अ‍ॅप प्लॅटफॉर्मना दुहेरी भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. हे धोरण बेकायदेशीर सेवा पुरवणाऱ्यांना संरक्षण देणारे आहे आणि प्रवासी व चालक दोघांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची