विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
सीरियात सरकारी सैन्याची माघार ड्रुझ अल्पसंख्याकांच्या गटाने घेतला सुवेदा शहराचा ताबा
July 17, 2025 04:59 PM 71
सुवैदा : ड्रुझ अल्पसंख्याकांसोबत झालेल्या युद्धबंदी करारांतर्गत सीरियाच्या सरकारी सैन्याने सुवेदा (suwayda) शहरातून माघार घेतली आहे. सरकारी सैन्याने माघार घेताच ड्रुझ अल्पसंख्याकांच्या सशस्त्र गटाने सुवेदा शहराचा ताबा घेतला. सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलवर त्यांच्या देशात फूट पाडण्याचा तसेच तणाव आणि अराजकता पसरवण्याचा आरोप केला आहे.
इस्रायलने सलग तीन - चार दिवस सीरिया सरकार आणि सीरियन सैन्याला लक्ष्य करुन हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे ड्रुझ अल्पसंख्याकांच्या कारवाईला बळ मिळाले. ड्रुझचे रक्षण करण्यासाठी आणि इस्लामिक दहशतवाद्यांना त्यांच्या सीमेपासून दूर ढकलण्यासाठी हवाई हल्ले केल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. इस्रायलच्या सततच्या प्रभावी हवाई हल्ल्यांनंतर सीरियन सरकारने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
ड्रुझ समाज इस्रायल आणि सीरियात आहे. इस्रायलच्या सैन्यात ड्रुझ समाजाचे सदस्य आहेत. ड्रुझ समाजातील अनेकांनी इस्रायलसाठी बलिदान दिले आहे अथवा शौर्य गाजवले आहे. या शौर्याची आणि बलिदानाची जाणीव ठेवून इस्रायलने ड्रुझचे रक्षण करण्यासाठी आणि इस्लामिक दहशतवाद्यांना त्यांच्या सीमेपासून दूर ढकलण्यासाठी हवाई हल्ले केले.
याआधी डिसेंबर २०२४ पासून इस्लामिक बंडखोर सीरियात वेगाने सक्रीय झाले आहेत. या बंडखोरांचा आणि सीरियातील ड्रुझ अल्पसंख्याकांच्या गटाचा संघर्ष मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सीरिया सरकारच्या तुलनेत इस्लामिक दहशतवाद्यांची ताकद वाढू लागल्याचे पाहून इस्रायलने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.