ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा फायदा घेत या खाडीत अवैध हातभट्टी मद्य निर्मितीत वाढ झाली होती. त्याअनुषंगाने उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षित जवानांनी बोटीने जावून सर्व हातभट्टी मद्य निर्मिती ठिकाणे १५ जुलै रोजी नष्ट केली. या कारवाईत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा १९४९ अंतर्गत ०३ गुन्हे नोंद करण्यात आले.


ठाणे जिल्ह्यामध्ये सामूहिक मोहिम राबवून केलेल्या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे १७८ ड्रम व १००० ली. क्षमतेचे ३ बॉयलर त्यामध्ये ३३ हजार ६०० लीटर रसायन व ३५ ली. गावठी दारु, इतर हातभट्टी साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी काही मुद्देमाल नाशवंत असल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला.


राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये उप अधीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकाते, सहा. दुय्यम निरीक्षक रणजीत आडे, तसेच जवान संदिप धुमाळ, अविनाश जाधव, रामचंद्र पाटील, राजु राठोड, भाऊसाहेब कराड, नारायण जानकर, विनोद अहिरे, प्रविण धवणे, रुपेश खेमनार यांचा सहभाग होता.


हातभट्टी दारु, अवैध मद्य निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे विभागाची धाडसत्र मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांना अशा अवैध धंदयांबाबत तक्रार करायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधू शकतात, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

अवयवदानातून मिळाले ६ रुग्णांना जीवदान

ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे.

बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत ;लोकवस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे.

पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई

ऐतिहासिक म्हसोबाच्या यात्रेसाठी मुरबाड प्रशासन सज्ज

३ जानेवारीपासून यात्रेला प्रारंभ; तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सक्रिय मुरबाड : २२६

डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवार, ३० डिसेंबर

ठाण्यात पुन्हा बिबट्या

वागळे इस्टेट परिसरातील नागरिक घाबरले ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील पोखरण रोडमध्ये बिबट्या दिसला होता. आज