छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनोस्कोचा जागतिक मानांकन मिळण्याच्या कार्यात मोठे योगदान दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचा आणि राज्यसभेत नियुक्ती झाल्याबद्दल एँड उज्वल निकम यांचा काल संध्याकाळी. सांताक्रूझ येथे भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.
धर्मांतरणाविरुद्ध कायदा आणणार : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, खोटी कागदपत्रे दाखवून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा ...
यावेळी बोलताना एँड उज्वल निकम यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. पण कार्यकर्त्यांनी सावध राहायला हवे, रात्र वैऱ्याची आहे. कारण फेक नेरेटीव्ह आणि खोट्या अफवा पसरवणाऱ्यांपासून आपल्याला सावध रहायला हवे. भाषेच्या नावाने असेच फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे, असे सांगतानाच लोकसभेच्या वेळी आपण या फेक नेरेटीव्हचे बळी पडलो. म्हणून अधिक सावध रहायला हवे, मला तर काँग्रेसने निवडणूकीत देशद्रोही ठरवले. माझ्यासाठी हा धक्काच होता. देशाच्या विरोधात मी विचार ही करु शकत नाही. मला त्या रात्री झोप लागली नाही. मी न्यायालयात जाऊन त्यांच्या विरोधात लढलो असतो पण त्याने आरोप करणाऱ्यांनाच अधिक प्रसिद्ध मिळाली असती म्हणून मी टाळले. त्यामुळे अशा लोकांपासून भाजपा कार्यकर्त्यांनी सावध रहायला हवे, असे आवाहन एँड निकम केले.
भाजपा आणि अन्य पक्षात फरक : मंत्री आशिष शेलार
यावेळी मंत्री एँड आशिष शेलार म्हणाले की, राज्य सभेवर पाठवण्याची वेळ आली त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षाने त्यावेळी मुंबईकरांसाठी लढणाऱ्या वकिलाला पाठवले नाही. मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपी याकूब आणि अन्य देशविरोधी खटल्यातील आरोपींची बाजू घेऊन लढणाऱ्या वकिलाला तुम्ही राज्यसभेत पाठवलेत. भाजपाने याकूब, कसाबला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून लढणाऱ्या मुंबईकरांच्या वकिल एँड उज्वल निकम यांना भाजपाने पाठवले हा फरक आहे. तसेच उबाठाने तर बाँम्ब स्फोटातील शिक्षा भोगून आलेल्या मुसा याला घेऊन प्रचार केला तर याकूबला फाशी होऊ नये म्हणून काँग्रेसचे आमदार स्वाक्षरी मोहीम राबवत होते, त्यांना मंत्री करण्याचे काम काँग्रेसने केले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात हे सहभागी होते. म्हणून भाजपा आणि अन्य पक्षात फरक आहे, अशा शब्दांत मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला. सांताक्रूझ येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार एँड पराग अळवणी, संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, सुशम सावंत, महेश पारकर, अँड दिनानाथ तिवारी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.