मुंबई: न्यूजेन सॉफ्टवेअर (Newgen Software) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर होताच कंपनीच्या शेअर्समध्ये ५.६३% घसरण झाली आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात (consolidated net profit) थेट ४.५% वाढ झा ल्याने मागील वर्षाच्या जून तिमाहीतील ४७.५६ कोटीवरून वाढत या जून तिमाहीत ४९.७२ कोटीवर एकत्रित नफा मिळाला. कंपनीने घोषित केलेल्या निकालातील माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) फंडामेंटल मध्ये घसरण झाली आहे.
कंपनीच्या ईबीटीडीए म्हणजेच करपूर्व कमाई (EBITDA) यांमध्ये ६% घसरण झाली आहे. परिणामी कंपनीच्या मार्जिनमध्ये १५% वरून १४% घसरण झाली.मागील वर्षाच्या जून तिमाहीतील ३१४.७१ कोटींवरून कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये १.८८% वाढ झाली. परिणामी महसूल ३१४.७१ कोटींवरून महसूल वाढत ३२०.६५ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाढलेल्या कर्मचाऱ्यांवरील खर्चामुळे, तसेच कामकाजात झालेल्या अतिरिक्त खर्चामुळे कंप नीच्या कामकाजातील कामगिरीत परिणाम झाला. अमेरिकेतील व्यवसाय महसूल देखील गेल्या वर्षीपेक्षा स्थिर राहिला परंतु मार्च तिमाहीच्या तुलनेत त्यात घट झाली. अमेरिकेतील व्यवसाय महसूलही स्थिर राहिला आहे.
एकूण महसूलात या तिमाहीत २% वाढ झाली आहे. भारतीय उपखंडातील कंपनीच्या व्यवहारात वाढ झाली असली तरी मागील तिमाहीतील प्रगतीच्या तुलनेत यंदा घसरण झाली. यापूर्वी कंपनीने ५ जूनला २.५ दशलक्ष डॉलर्सची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन (Digital Transformation) साठी आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये ९% वाढ झाली होती. आज मात्र प्रारंभिक निकाल झाल्यानंतर कंपनीचा समभाग (Share) कोसळला आहे. दुपारपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी २ वाजेपर्यंत ५.९०% कोसळत १०२७.६० रूपयांवर पोहोचला होता.