मुंबईहून ४ तासांत मालवण, ३ तासांत रत्नागिरी

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने चाकरमान्यांचा होणार सुखद जल प्रवास


मुंबई (प्रतिनिधी) : यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केली. मंत्री राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लवकर सागरी प्रवासाचा पर्याय खुला होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग एम टू एम फेरी लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये एकावेळी ५०० प्रवाशांसह १५० गाड्या वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच मुंबई ते विजयदुर्ग प्रवास अवघ्या ४.५ तासांत तर मुंबई ते रत्नागिरी अवघ्या तीन तासांत करता येणार असल्याचेही ते म्हणाले.


गणेशोत्सवासाठी गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणेशोत्सवात समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर अवघ्या तीन तार्सात रत्नागिरी गाठता येणार आहे.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच महामार्गाची अर्धवट कामे याचा विचार करता जलमागनि गणपतीला गावी जाणे सोयीस्कर ठरणार आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहे.


गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, खड्ढे आणि गणेशोत्सवातील प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर, रो-रो सेवेमुळे कोकण प्रवास आता अधिक आरामदायी, वेगवान आणि सोयीचा होणार आहे. रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी आणि वेळखाऊ प्रवास टाळून अवघ्या काही तासांत कोकण गाठणे शक्य होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून परवडणाऱ्या दरात हा नवा जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. आता अनेक वर्षांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत ९ रुपयात करता येणार वातानुकूलित प्रवास, जाणून घ्या... केव्हा कुठे मिळणार ही सेवा?

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्टेशनबाहेर पडताच सुरू होणारा ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर मुंबई : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर

मुंबई–नवी मुंबई प्रवास होणार अधिक स्वस्त; टोलमध्ये ५० टक्के सूट, ई-वाहनांसाठी टोल माफ

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल बिहारी वाजपेयी

वय लहान पण कीर्ती महान; पुण्यातील सई थोपटेनी नगरसेवक बनून रचला इतिहास

Pune Municipal Corporation Election 2026 : सई थोपटे या तरुणीने अतिशय लहान वयात पुणे महानगरपालिकेत मोठं यश मिळवित इतिहास रचला आहे.ती

महापौरपदासाठी पक्षांमध्ये लॉबिंग सुरू.. कोण होणार महापौर?

Municipal Corporation Election Results 2026 : मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे यांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये पारडे कोणाचे जड होणार,

मुंबईचा महापौर कोण होणार? भाजपातील 'या' पाच नावांची रंगते आहे चर्चा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आता मुंबईला वेध लागलेत ते मुंबईचा महापौर कोण होणार याचे? मुंबईची