India US Deal: 'भारताशी डील लवकरच होईल'

डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत !

प्रतिनिधी: 'भारताशी डील लवकरच होईल' असे प्रतिपादन युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. रिअल अमेरिका वॉईस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यानुसार त्यांनी बोलतांना सांगित ले,' भारत व युरोपियन युनियनशी सकारात्मक बोलणी सुरू आहे. यशस्वी झाल्यास भारताला इतर राष्ट्रांपेक्षा कमी टेरिफ लावू शकतो' असे ट्रम्प म्हणाले आहेत. 'आपण भारताच्या खूप जवळ आहोत आणि युरोपियन युनियनशीही डील शक्य आहे कदाचित दोघां शी डील संभव आहे' असे ते पुढे म्हणाले. याशिवाय जागतिक बाजारपेठेतील छोट्या देशांबाबत बोलताना म्हणाले,' कॅनडावर बोलताना त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित कॅनडाशी गोष्ट अस्पष्ट आहेत' असे स्पष्ट शब्दात अधोरेखित केले. इतर छोट्या १५० देशांसाठी आम्ही युनिफाईड टेरिफ लावू असे सांगितले आहे. वार्ताहरांशी बोलताना परवा उशीरा ट्रम्प यांनी म्हटले होते की ते १५० हून अधिक देशांना टॅरिफ नोटिस जारी करतील, ज्यांचे दर १०% किंवा १५% वर याप्रमाणे आकारू शकतात ज्यामुळे त्यांचा व्यापार अजेंडा आणखी पुढे जाईल. ट्रम्प यांनी याविषयी अधिक बोलताना पत्रकारांना सांगितले की,'आम्ही १५० हून अधिक देशांना पेमेंट नोटिस पाठवू आणि नोटिसमध्ये टॅरिफ दर निर्दिष्ट केला जाईल.'

ट्रम्प पुढे म्हणाले, 'या देशांच्या गटासाठी, प्रत्येक देशासाठी ते समान असेल हे देश मोठ्या शक्ती नाहीत आणि आमच्यासोबतचा त्यांचा व्यापार मोठा नाही.' मात्र नव्या दिलेल्या मुलाखतीत मात्र ट्रम्प यांनी घुमजाव केले. नंतर बुधवारी रिअल अमेरिका व्हॉइस यांना दिलेल्या एका मुलाखतीत मात्र ट्रम्प म्हणाले की हा दर '१०% किंवा १५% असू शकतो, आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही.' अलिकडच्या काळात, ट्रम्प यांनी टॅरिफ मागण्या विधानांची मालिकाच सुरू केली आहे. ज्यामध्ये इतर अर्थव्यवस्थांना माहिती देण्यात आली आहे की जर ते अमेरिकेशी चांगल्या 'अटींवर' वाटाघाटी करू शकत नसतील, तर नवीन टॅरिफ १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

या पत्रांनी ९ जुलैची मूळ मुदत १ बँक ऑगस्टपर्यंत ट्रम्प यांनी नुकतीच वाढवली होती. ज्यामध्ये अमेरिकेने अनेक व्यापारी देशांना जेरीस आणण्याचे काम केले. जरी ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांना सुरुवातीला अनेक देशांसोबत व्यापार करार होण्याची आशा हो ती परंतु अलीकडेच ट्रम्प यांनी या टॅरिफ सूचनांना 'करार' म्हटले. तरीही दुसरीकडे मात्र ट्रम्प यांनी देशांसाठी हे कर कमी करण्यासाठी करार करण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत ज्यात भारताचाही समावेश आहे.

भारतीय शिष्टमंडळाने वारंवार वाटाघाटी सुरू केल्याने काही वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प इंडोनेशियलाला आकारलेल्या १९% पेक्षा कमी कर भारतावर लादू शकतात. आतापर्यंत लागू केलेले कर दर एप्रिलमध्ये ट्रम्पने धमकी दिलेल्या दरांसारखेच आहे त. त्यावेळी, बाजारातील चढउतारांनंतर, ट्रम्पने ते दर त्वरित स्थगित केले, परंतु सातत्याने युएस राष्ट्राध्यक्षांचा धमक्यांमुळे आर्थिक बाजारपेठांमध्ये अधिक अनिश्चितता निर्माण झाली आणि युरोपियन युनियनसारख्या व्यापारी भागीदारांना आश्चर्यचकित करून ३०% पेक्षा अधिक टेरिफ लावला ज्याचा फटका आजही युरोपियन शेअर बाजारात दिसत आहे. मुलाखतीत, कॅनडासाठी निकाल काय असेल असे त्यांना विचारले असता, ट्रम्प म्हणाले, 'हे सांगणे खूप लवकर आहे.'ऑगस्टमध्ये अमेरिका काही कॅनेडियन वस्तूंवर ३५% कर लादेल.आता भारताबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक असल्याचे म्हटले तरी अजूनही तडजोड झालेली नाही. परिणामी अनिश्चितता कायम आहे.
Comments
Add Comment

Stock Market Update: पतधोरण समितीच्या निर्णयापूर्वी शेअर बाजारात सावधगिरीची घसरण बँक निर्देशांकात विशेष लक्ष सेन्सेक्स २४ व निफ्टी २ अंकाने घसरला

मोहित सोमण: थोड्याच वेळात आरबीआयच्या रेपो दराबाबत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा वित्तीय पतधोरण समितीची निकाल

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप, तरुण कलाकारांसाठी सुवर्णसंधी

सुरेश वांदिले भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार