प्रतिनिधी: जगातील सर्वात जुने प्रतिष्ठित आणि सर्वात मौल्यवान क्रिप्टो बिटकॉइन (BTC) करन्सीने गुरुवारी सकाळी प्रति बिटकॉइन १०१३३०१४ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. ईटीएफ (Exchange Traded Fund ETF)मधील गुंतवणूकदारांंची मजबूत आवक (Inflow) या कारणाने ही या तेजी प्राप्त झाली आहे अशी चर्चा सुरू आहे. बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, इथेरियम Ethereum (ETH), सोलाना Solana (SOL),रिपल (Ripple XRP), लाईटकॉइन (Litecoin LTC) सारख्या इतर लोकप्रिय क्रिप्टोग्रा फीत (Cryptography) एकूण मार्केट फियर अँड ग्रीड इंडेक्स १०० पैकी ७० (Greed) पातळीवर राहिल्याने या क्रिप्टोग्राफी करन्सी तेजीत आहेत.
११ वाजेपर्यंत जागतिक क्रिप्टोमार्केट बाजार भांडवल (Market Capitalisation) ३.७८ ट्रिलियन डॉलर्स होते ज्यामध्ये गेल्या २४ तासात साधारणतः १.५२ टक्क्याने वाढल्याने क्रिप्टोग्राफी करन्सी महागली आहे. बिटकॉइन बाबतीत गेल्या २४ तासात ०.६२% वाढ झाली आहे. बाजारातील माहितीनुसार, सध्या बिटकॉइन किंमत १०१६१११९.४५ रूपये आहे.बिटकॉइन बाजार भांडवल २०२ ट्रिलियनवर गेले आहे. बिटकॉइनची आंतरराष्ट्रीय किंमत ११८४२२ डॉलरवर पोहोचली, जी गेल्या २४ तासांत ०.६८ टक्क्यांनी वाढली. भार तीय एक्सचेंजेसनुसार, बीटीसी (BTC) ची किंमत सकाळी ११ वाजेपर्यंत १.०१ कोटी रुपये आहे पुन्हा एकदा बाजारातील अस्थिरतेमुळे ०.३२% घसरण बिटकॉइनमध्ये झाली असली तरी सुरुवातीला सकाळी बिटकॉइनमध्ये मोठी वाढ झाली होती.
इथरियम (ETH) ची आजची किंमत ३३४३ डॉलरहून अधिक वाढली असून भारतीय रूपयात ती ७.१९% वाढत २८६४९६ रूपयांवर सकाळी ११ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत किंमत ७.२७ टक्क्यांनी वाढली. भारतातील इथरियमची किंमत कालपर्यंत २. ६१ लाख रुपये झाली जी आता वाढून २७६४९६ रूपयांवर गेली. गेल्या काही तासात ही किंमत १९२२७ रूपयांनी वाढली आहे. Dogecoin (DOGE) या क्रिप्टोग्राफी करन्सीची आजची किंमत माहितीनुसार २४ तासांत ६.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या डी ओजीई करन्सी काही तासांपूर्वी किंमत ०.२१ डॉलरवर होती. सकाळी ११ वाजेपर्यंत भारतात Dogecoin ची किंमत १७.५६ वरून वाढत १८.१५ रुपये झाली आहे.
लीटकॉइनची (Litecoin) २४ तासांत ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली लीटकॉइची किंमत ९६.५७ डॉलरवर सुरू होती. भारतात एलटीसी (LTC) किंमत ८,३४७.३० रुपये होती. सकाळी ११ वाजेपर्यंत ही किंमत वाढत ८३७३.०६ रुपयांवर गेली आहे. रिपल (XRP) किंमत ३.०५ डॉलरवर होती, २४ तासांत ४.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सकाळी भारतात रिपल किंमत २५२.४५ रुपये होती जी सकाळी वाजेपर्यंत ३.१७% वाढत २६९.३१ रुपयांवर गेली आहे. सोलानाची (Solana) किंमत १७०.७४ डॉलरवर होती, २४ तासांत ४.९४ टक्क्यांनी वाढली असून भारतातील किंमत १४,४१६.७२ रुपये होती.
सकाळी ११ वाजेपर्यंत ५.४२% वाढत १४७५० भारतीय रुपयांवर किंमत गेली आहे.भारतीय बाजारात व आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचे लोण कायम असताना सोन्याचांदीखेरीज क्रिप्टोग्राफी हा पर्याय गुंतवणूकदारांनी निवडल्याने क्रिप्टो किंमती आज सातत्याने वाढत आहे. यापूर्वी मागील आठवड्यात क्रिप्टोग्राफीने नवा उच्चांक गाठला होता.