चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची चाळण

ठेकेदाराच्या राजकारणामुळे लाखोंचा निधी परत जाण्याची शक्यता


सफाळे  :पालघर जिल्ह्यातील चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढून ते काम वाडा येथील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे ठेकेदारांच्या राजकारणामुळे रस्ता दुरुस्तीचा लाखोंचा निधी परत जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.


चहाडे-तांदूळवाडी रस्ता पाऊस पडताच खड्ड्यात गेला असून या खड्डयांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताच्या घटना सतत घडत असतात. चहाडे- तांदुळवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ३० लाखाचा निधी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मिळाली. या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर सुद्धा काढले होते. हे टेंडर वाड्यातील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे हे काम वेळीच पूर्ण झालेच नाही परिणामी रस्त्याची अक्षरशः चाळण होत चालली आहे. तर काम होत नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो प्रवाशी प्रवास करत असतात.


त्या मध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध , शाळेचे विद्यार्थी तसेंच अनेक कामगार यांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत असतात. कोणाचे प्राण गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का ? असे लोक दपक्या आवाजात बोलत आहेत. हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर प्रशासनाने सोडवला नाही तर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा संतप्त सुरात इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Palghar News : मोखाड्यात १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप; २२ महिलांविरोधात गुन्हा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Palghar Gang Rape : धक्कादायक! पालघरमध्ये तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू

Palghar Gang Rape : पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape)