मुंबई: अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आलीये. यात राज्यातील २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हे विद्यार्थी १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतील.
राज्यात ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ३२ हजार ९६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता.
यातील ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२, कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.